शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सराफ बाजार बंदमुळे नागरिकांचा खोळंबा

By admin | Updated: March 13, 2016 01:06 IST

सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदनंतरही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १० दिवसांपासून सराफांच्या बंदमुळे लग्नसमारंभाकरिता सोने खरेदी करणाऱ्यांची

रहाटणी : सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदनंतरही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १० दिवसांपासून सराफांच्या बंदमुळे लग्नसमारंभाकरिता सोने खरेदी करणाऱ्यांची, गहाण ठेवणाऱ्यांची, तसेच दागिने बनविणाऱ्या कारागिरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सध्या विवाह शुभारंभाला सुरुवात झाली आहे, वर-वधू पक्षांच्या पित्यांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला असूनही सराफा बंदमुळे खरेदीचा खोळंबा झाला आहे. बंदमुळे कोटीचा व्यवहार ठप्प झाला आहे, तर सोने दुकानात काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.सध्या सगळीकडे लग्नसराईची धुम सुरू झाली आहे. केवळ एप्रिल महिन्यातच लग्नाचे मुहूर्त आहेत. अनेक जण लग्नापूर्वीच दागिने तयार करण्याकरिता आताच आॅर्डर देतात. तर अनेक जण घरातील जुने सोने मोडून आपल्या लेकीच्या लग्नाकरिता सोन्याचे दागिने घेतात. गेल्या १० दिवसांपासून सतत बंद असलेल्या बाजारामुळे अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. तसेच आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता साधारण नागरिक आपल्याकडील सोने, चांदी गहाण ठेवण्याकरिता बाजारात जात आहे. मात्र, बंद बाजारामुळे अखेर त्यांना अवैध सावकारांच्या दारी जायची वेळ येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सराफ दुकान कडकडीत बंद असून, दररोज या दुकानांतून लाखोंची उलाढाल होते. मात्र, गेल्या १० दिवसांपासून बंद असलेल्या दुकानांमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झालेली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारासह अन्य बाजारातसुद्धा मंदीची लाट पसरलेली दिसत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. उन्हाळ्यात शाळेच्या सुट्यांमुळे विवाहाच्या तारखांना पसंती दिली जाते. सुटीच्या नियोजनानुसार आधीपासून लग्नाची तयारी केलेल्या कुटुंबाची मात्र सध्या फसगत झाली आहे. ऐनवेळी किंवा विवाहाच्या आठ-दहा दिवस आधी दुकानात जाऊन दागिन्यांच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्यांचे नियोजन फसले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक ग्राहक सराफ बाजारात येत आहेत, पण त्यांच्या पदरी निराशा येत आहे. सराफांची दुकाने उघडत नसल्याने खरेदी करायची कशी, अशा विवंचनेत अनेक कुटुंबे पडली आहेत. (वार्ताहर)