शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंडचे गुंतवणूकदार चिंताग्रस्त

By admin | Updated: December 9, 2015 00:17 IST

चिटफंडमध्ये गुंतविण्यात आलेल्या मोठ्या रकमांचे गैरव्यवहार होत असल्याच्या ठिकठिकाणच्या घटना उघड होऊ लागल्या आहेत.

पिंपरी : चिटफंडमध्ये गुंतविण्यात आलेल्या मोठ्या रकमांचे गैरव्यवहार होत असल्याच्या ठिकठिकाणच्या घटना उघड होऊ लागल्या आहेत. कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे केल्याप्रकरणी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही चिटफंड चालकांविरोधात पोलिसांकडे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले असून संभ्रमात पडले आहेत. दुप्पट, तिप्पट आर्थिक लाभाचे आमिष दाखवून चिटफंड तसेच अन्य खासगी संस्थांच्या फसव्या वित्त योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. कालांतराने चिटफंड अथवा अशा संस्थांचे संचालक गाशा गुंडाळून गायब होतात. पुणे जिल्ह्यात चिटफंड संचालकांवर दाखल होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत. केलेली गुंतवणूक वाया जाणार की काय? दुप्पट रक्कम मिळणे तर दूरची बाब. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम तरी परत मिळेल का? अशी विंवचना त्यांच्यापुढे आहे. ज्या चिटफंड संस्थांचा आर्थिक घोटाळा चव्हाट्यावर आलेला नाही, संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल नाहीत, अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करणारेही भयभीत झाले आहेत. वृत्तपत्रात बातमी येताच आपण ज्या चिटफंडमध्ये गुंतवणूक करतो, त्या संस्थेचे तर नाव नाही ना? अशी शंका त्यांच्या मनात निर्माण होत आहे. शहरातील काही चिटफंड संचालकांनी गुंतवणूकदारांचे जमा झालेले पैसे बांधकाम व्यवसायात व अन्यत्र गुंतवले आहेत. (प्रतिनिधी)