शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडला ‘कट्यार’चा होणार सुवर्णमहोत्सव

By admin | Updated: April 29, 2017 04:03 IST

पिंपरी-चिंचवडच्या सांगीतिक चळवळीचा मानदंड असणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशनच्या वतीने ५ ते ७ मे रोजी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या सांगीतिक चळवळीचा मानदंड असणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशनच्या वतीने ५ ते ७ मे रोजी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. या वेळी स्वर, शब्द आणि अभिनयाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाचा सुवर्णमहोत्सवही साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी दिली.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीनदिवसीय महोत्सव दररोज सायंकाळी साडेसहा या वेळेत होणार आहे. या विषयी डॉ. घांगुर्डे म्हणाले, ‘‘संस्थेच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या संगीत महोत्सवाचे यंदाचे तिसावे वर्ष आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर शुक्रवारी भाग्येश मराठे, प्रथमेश लघाटे, डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचे गायन, धनश्री नातू यांचे कथक, शनिवारी आदित्य मोडक, गंधार देशपांडे यांचे गायन, स्वीकार कट्टी यांचे सतारवादन, अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन, आदित्य ओक यांचे संवादिनीवादन, सुनील अवचट यांचे बासरीवादन, स्वरांगी मराठे, शामिका भिडे यांचे सहगायन सादर होणार आहे. रविवारी महोत्सवाची सांगता होणार असून, नादब्रह्म, पुणे निर्मित ‘संगीत कट्यार काळजात घुसली’चा प्रयोग सादर होणार आहे. महोत्सवात गायन, वादन आणि नृत्य सादर होणार आहे. सुवर्णमहोत्सवी नाटकांचाही प्रयोग या वेळी सादर होणार आहे.’’ पत्रकार परिषदेस विश्वस्त नाना दामले, विनीता रायकर, वरद पुरंदरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)