चिंचवड : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिंचवड येथे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. श्रीहरी आनंद देशमाने (वय ५, रा. गोयल सोसायटी, केशवनगर, चिंचवड) असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोयल सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर देशमाने कुटुंबीय राहतात. सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीहरी याची आई श्रीहरीला घरात ठेवून मोठ्या मुलाला शिकवणीला सोडण्यासाठी बाहेर गेल्या. त्या वेळी घरात एकटाच असलेला श्रीहरी खेळत-खेळत गॅलरीमध्ये आला. तेथून तोल जाऊन तो खाली पडला. श्रीहरीला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी श्रीहरीला मृत घोषित केले. दरम्यान शहरामध्ये बाल्कनीमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या घटना वाढल्या असून, या घटना रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहेत. यासाठी पालकांनी विशेष दक्षता घ्यावी अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
इमारतीवरून पडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 00:48 IST