शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरशालेय नृत्यस्पर्धेत बालचमूंची धमाल

By admin | Updated: February 5, 2016 01:45 IST

पिंगा ग पोरी पिंगा..., गणपती बाप्पा मोरया..., छान किती दिसते फुलपाखरु .., रिंगा रिंगा..., आयो रे आयो रे रंगीलो... अशा गाण्यांवर सादर केलेल्या कलाविष्काराने चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

पिंपरी : पिंगा ग पोरी पिंगा..., गणपती बाप्पा मोरया..., छान किती दिसते फुलपाखरु .., रिंगा रिंगा..., आयो रे आयो रे रंगीलो... अशा गाण्यांवर सादर केलेल्या कलाविष्काराने चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत’ बाल विकास मंच व एएसएम ग्रुप इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल आयोजित आंतरशालेय नृत्यस्पर्धा उत्साहात पार पडल्या. अ व ब या दोन गटांत झालेल्या स्पर्धेत बालचमूंनी प्रेक्षागृहात एकच जल्लोष केला. स्पर्धेत २० शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळांचा उत्साह, मुलांची ड्रेपरी व तयारी वाखाणण्यासारखी होती. प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.प्राथमिक गटात ७ शाळा सहभागी झाल्या होत्या तर माध्यमिक गटात एकूण १३ शाळा सहभागी होत्या. अ गटामध्ये बांठिया प्राथमिक जैन विद्या मंदिर, एचए मराठी माध्यम आणि पीसीएमसी भोसरी इंग्रजी विद्यालयाने लोकनृत्य प्रकारात सहभाग घेतला. तर एच. ए स्कूल इंग्लिश मीडिअम, जयवंत प्राथमिक शाळा, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी समर्थ विद्या मंदिर यांनी बॉलिवूड-हिपहॉप या नृत्यप्रकारात सहभाग घेतला. सुरुवातीला बांठिया स्कूलने ‘आयो रे, आयो रे, रंगीलो’ हे राजस्थानी लोकनृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. जयवंत प्राथमिक विद्यालयाने ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या गाण्यावेळी फुलपाखरूच रंगमंचावर अवतरल्याने सर्वजण अवाक् होऊन पाहू लागले. तर ब गटामध्ये गीतामाता स्कूल, शिवभूमी विद्यालय, फत्तेचंद जैन विद्यालय, सुबोध माध्यमिक विद्यालय, सरस्वती माध्यमिक विद्यालय, ताराबाई मुथा कन्या प्रशाला, छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय या शाळांनी लोकनृत्य प्रकारात सहभाग घेतला. एसएनबीपी इंटरनॅशनल, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, एच. ए हायस्कूल इंग्रजी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, महात्मा फुले विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय यांनी बॉलिवूड-हिपहॉप सादर केले. शिवभूमी विद्यालयाने कोळी नृत्याद्वारे कोळी समाजाचे दर्शन घडविले. शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाने डोंबारी नृत्य तर ताराबाई मुथा कन्या शाळेने आसामी नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर आधारित सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर केले. सचिन दाभाडे, रेखा खडका, कुणाल मोरे यांनी परीक्षण केले. इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलच्या उमित कौर यांनी शाळेबद्दल माहिती दिली. (प्रतिनिधी)