शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री नीती यशस्वी

By admin | Updated: February 24, 2017 03:00 IST

राष्ट्रवादीच्याच शिलेदारांची फोडाफोडी करून सत्ता हस्तगत करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

पिंपरी : राष्ट्रवादीच्याच शिलेदारांची फोडाफोडी करून सत्ता हस्तगत करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, तर स्वबळावर लढण्याचा नारा देत शिवसेनेने पायावर धोंडा पाडून घेतल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसला खातेही खोलता आले नाही. प्रमुख राजकीय पक्षाविरुद्ध बंड करून अपक्षांनी आपली ताकत दाखवून दिली आहे.महापालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये १२८ जागांसाठी निवडणूक झाली. रवी लांडगे यांच्या माध्यमातून भाजपाने बिनविरोध खाते खोलल्याने उर्वरित १२७ जागांसाठी मतदान झाले. शहरातील ११ लाख ९२ हजार ८९ मतदारांपैकी ६५.३५ टक्के म्हणजेच ६ लाख ७९ हजार ६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३ लाख ५८ हजार ५०६ महिला, तर ४ लाख २० हजार ५४७ पुरुष मतदारांचा समावेश होता. शहरातील ११ मतमोजणी केंद्रांवर आज सकाळी दहाला सुरुवात झाली. चोख बंदोबस्तात शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. सर्वांत आधी प्रभाग क्रमांक ३, चऱ्होली मोशीचा निकाल हाती आला. या ठिकाणी भाजपाने तीन जागा पटकावित विजयी पताका फडकावली. राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. येथूनच शहरातील एकूण लढतीचे चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली. खरा सामना भाजपा आणि राष्ट्रवादीमध्येच झाला. या  लढाईत शिवसेना मागे फेकली गेली. कॉँग्रेसचे नामोनिशाण दिसेनासे  झाले. सचिन चिखले यांच्या माध्यमातून एकमेव जागा पटकावित मनसेचे नाक राखले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची कुशल व स्वच्छ प्रतिमा आणि भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांचा या यशात मोलाचा वाटा असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी कॉँग्रेसने २० वर्षांत शहराच्या विकासापेक्षा त्यांचा भ्रष्ट कारभार व गैरव्यवहाराचीच अधिक चर्चा झाली. त्यामुळे जनता पर्याय शोधत होती. केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही परिवर्तनाची अपेक्षा शहरवासीयांना होती.