शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारा मुख्यमंत्री - शरद पवार

By admin | Updated: February 18, 2017 22:33 IST

राठी माणसाच्या त्यागातून साकारलेल्या या राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत अशी टीका शरद पवारांनी केली.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. १८ -   राज्याचा प्रमुख या नात्याने राज्याची राज्य एकसंध ठेवणे, हे मुख्यमंत्र्याचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु मुख्यमंत्री पदावर येताच महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करण्याची भूमिका घेतली जाते. मराठी माणसाच्या त्यागातून साकारलेल्या या राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगवी येथे केली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगवी येथे  माजी केंद्रीय मंत्री पवार यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गुजरातपासून महाराष्ट्र वेगळा करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला गेला. त्यात मराठी माणसाचे रक्त सांडले. मराठी भाषिकाच्या त्यागातुन महाराष्टÑ राज्य अस्तित्वात आले. ही मराठी अस्मिता जपण्याऐवजी तोडण्याचे काम राज्याच्या प्रमुखाकडून केले जात आहे. ही दुदैवार्ची बाब आहे. ५० वर्षे राजकारणात आहेत. या कालावधित अशा पद्धतीने भूमिका निभावणारा हा पहिलाच राज्यकर्ता आहे.