शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

केअर टेकरकडून फसवणूक, तिघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:10 IST

केअर टेकर म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीनेच वाकड येथील एका वृद्ध शेतकऱ्याची तब्बल १ कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी : केअर टेकर म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीनेच वाकड येथील एका वृद्ध शेतकऱ्याची तब्बल १ कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापू नामदेव वाकडकर (वय ६५, रा. वाकड, पुणे) असे आर्थिक फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी सूरज प्रकाश बोरोले (वय ३५), किरण नितेश सिंग, नितेशकुमार सिंग (तिघेही रा. सेलिना पार्क, हडपसर, पुणे) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू वाकडकर यांनी वाकड येथे असलेली वडिलोपार्जित जमीन एका बांधकाम व्यावसायिकाला विकली. त्याचे पैसे त्यांनी एचडीएफसी बँकेत ठेवले. बँकेने डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्या खात्यावरील व्यवहार पाहण्यासाठी सूरज याची नेमणूक केली. सुरुवातीला सूरजने प्रामाणिकपणा दाखविला. काही कालावधीनंतर बँकेतील काही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविण्याचा सल्ला त्याने वाकडकर यांना दिला. वाकडकर यांनी त्यास संमती दिली. तसेच काही रक्कम अ‍ॅक्सिस बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतविण्यास वाकडकर यांना सांगितले. त्या बँकेचे चेकबुक सूरजने स्वत:कडे ठेवले. चेकबुकवर आणि कोºया कागदावर वाकडकर आणि त्यांची पत्नी, मुलगा आणि सुनेच्या सह्या घेतल्या. वाकडकर यांच्या खात्यावरून वेळोवेळी तब्बल १ कोटी १२ लाख रुपये काढून त्याने स्वत:च्या खात्यावर जमा केले.वाकडकर यांच्या सुनेला मुलांच्या भवितव्यासाठी बँकेत स्वतंत्र गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, असे सांगून सूरज बोरोले याने त्यांच्याकडून दरमहा २५ हजार रुपये याप्रमाणे ३१ महिने रक्कम घेतली. तीसुद्धा त्याने स्वत:च्या खात्यावर जमा केली. दरम्यानच्या काळात एचडीएफसी बँकेने सूरजला नोकरीवरून काढून टाकले. त्यास नोकरीवरून कमी केल्याची माहिती सूरजने वाकडकर यांना दिली नाही. तो त्यांच्या संपर्कात राहिला. वेळोवेळी थोडीफार रक्कम देऊन वाकडकर यांना त्यांची रक्कम सुरक्षित असल्याचे भासवीत राहिला. एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा झाला नसल्याचे वाकडकर यांच्या लक्षात आले. बँकेत चौकशी केली असता, सूरजला बँकेने काही महिन्यांपूर्वीच कामावरून कमी केल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे वाकडकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सूरज आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी