खडकी : सरकारी बॅँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून बॅँक खात्याची माहिती घेऊन, वेगवेगळ्या बॅँक खात्यांतून १ लाख ३४ लाख २९९ रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गोरखनाथ जांबे (वय ४०, रा. खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात मोबाइलधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सरकारी बॅँकेतून बोलत असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीने जांबे यांना मोबाइलवर संपर्क साधला. संवादामध्ये गुंतवून, त्यांच्याकडून श्रीगोंदा येथील बॅँक खात्याची माहिती व ओटीपी क्रमांक मिळविला. त्याद्वारे जांबे यांच्या वेगवेगळ्या बॅँक खात्यांतून रक्कम काढली. (वार्ताहर)
बॅँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक
By admin | Updated: April 22, 2016 00:47 IST