शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पक्षनिधीत गुंतले पदाधिकारी

By admin | Updated: February 15, 2017 02:18 IST

महापालिका निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेतील काही पदाधिकारी उमेदवारांकडून

पिंपरी : महापालिका निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेतील काही पदाधिकारी उमेदवारांकडून पक्षनिधी जमा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवार वैतागले आहेत. पक्षनिधी द्यायचा की प्रभागात प्रचारासाठी खर्च करायचा या द्वीधा मनस्थितीत उमेदवार आहेत. शिवाय पक्षाने आता निधी जमा केल्यास तो निवडणुकीत कधी खर्च होणार ? असा सवाल उमेदवार करीत आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. पॅनलमधील उमेदवार निश्चित झाले. उमेदवारीअर्ज भरताना, उमेदवारांकडून पक्षनिधी वसूल करण्यात आला होता. आता ऐन निवडणुकीत पुन्हा उमेदवारांकडे धनादेशाची मागणी केली जात आहे. उमेदवारांकडील धनादेश एका यंत्रणेमार्फत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा केले जात आहेत. प्रचाराचा एक एक दिवस कमी होत आहे. ज्यांनी धनादेश दिले आहेत, त्यांना दिलेल्या रकमेच्या बदल्यात अपेक्षित सहकार्य पक्षाकडून मिळताना दिसत नाही. स्वत:च्या मर्जीने प्रचारासाठी खर्च करण्याची इच्छा असताना, पदाधिकाऱ्यांकडे निधी दिल्यामुळे मर्जीनुसार खर्च करता येत नाही. ज्यांनी कॉन्ट्रिब्युशन रक्कम जमा केली. त्यांच्याकडून प्रभागातील खर्चाबाबत प्रतिसाद नाही. स्वत:ही खर्च करायचा नाही, दुसऱ्यालाही करू द्यायचा नाही. अशी परिस्थिती अनेक उमेदवारांवर ओढवली आहे.त्यामुळे पक्षनिधी देण्यासाठी उमेदवारांकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार पदाधिकारी वरिष्ठांकडे करू लागले आहेत. (प्रतिनिधी)