शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रदर्शन केंद्राच्या आराखड्यात बदल; पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची तीन टप्प्यांत करणार उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:44 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रास आठ वर्षांनी मुहूर्त सापडला आहे. केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करून टप्प्याटप्प्याने गरजेनुसार प्रदर्शन केंद्र विकसित करण्याची कार्यवाही सुरू झाली. तीन टप्प्यांत आणि सुमारे पाच वर्षांचे नियोजन असून पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे.

-  विश्वास मोरे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोशी येथील पुणे आंतरराष्टÑीय प्रदर्शन केंद्रास आठ वर्षांनी मुहूर्त सापडला आहे. केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करून टप्प्याटप्प्याने गरजेनुसार प्रदर्शन केंद्र विकसित करण्याची कार्यवाही सुरू झाली. तीन टप्प्यांत आणि सुमारे पाच वर्षांचे नियोजन असून पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने तत्कालीन अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी आंतरराष्टÑीय प्रदर्शन केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली होती. देशातील व्यापाराचे केंद्र पुण्यात आणि विशेषत: पिंपरी-चिंचवडमध्ये व्हावे आणि शहराचा लौकिक जगात व्हावा, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला प्रोत्साहन दिले होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आराखड्याला मंजुरीही दिली होती. पहिल्या टप्प्यासाठी १०० कोटींचा निधी देण्याचेही सरकारने जाहीर केले होते. मात्र, बंड निवृत्त झाल्यानंतर हा प्रकल्प कागदावरच राहिला.प्रशासकीय अधिकाºयांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर प्रभाकर देशमुख, विकास देशमुख, एस. चोकलिंगम या अध्यक्षांपर्यंत आणि सुहास दिवसे, डॉ. योगेश म्हसे, सुरेश जाधव या मुख्याधिकाºयांच्या कालखंडात या प्रकल्पास गती मिळाली नाही. चंद्रकांत दळवी अध्यक्ष आणि सतीशकुमार खडके मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर या कामास गती मिळाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते नुकतेच प्रदर्शन केंद्राच्या सीमा भिंतीच्या कामाची सुरुवात झाली.असे होते नियोजनमोशीतील प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक आणि आठमधील दोनशे एकर जागेवर पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अ‍ॅन्ड कन्व्हेंशन सेंटर या कंपनीची स्थापना करण्यात आली. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव हे कंपनीचे अध्यक्ष म्हणनूही नियुक्त झाले. या केंद्राची उभारणी टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन केले. तसेच बीबीजी अलायन्स या अमेरिकी फर्मने या केंद्राचा मास्टर प्लॅनही केला होता. त्यास शासनाने मंजुरीही दिली होती. त्यानुसार या केंद्रात सात प्रदर्शन केंद्र, एक प्रदर्शन केंद्रासह, कन्व्हेंशन सेंटर, गोल्फ फोर्स, पंचतारांकित हॉटेल, व्यापारी कार्यालये, रिटेल मॉल, ओपन प्रदर्शन केंद्राचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात दोन प्रदर्शन केंद्र, कन्व्हेंशन सेंटरला आवश्यक त्या भौतिक सुविधा देण्याचे नियोजन केले होते.असा केला बदल :पुणे आंतराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व कन्व्हेंशन सेंटर केंद्राचे काम दि. २४ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे राबविण्याचे ठरले. त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन केंद्र उभे करण्याचे काम प्राधिकरणाने सुरू केले आहे.या प्रकल्पाच्या बृहत् आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे. या प्रदर्शन केंद्राची एकूण जागा सुमारे ९४ हेक्टर इतकी आहे. दोनशे एकरवर असणारे केंद्र शंभर एकरवरच उभारण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात खुले प्रदर्शन केंद्र हे ९८ हजार चौरस मीटर, बंदिस्त हॉल ३५ हजार चौरस मीटर, ३५ हजार चौरस फुटांचे व्यावसायिक केंद्र आणि संग्रहालय, कन्व्हेंशन सेंटर हे पाच हजार आसन क्षमतेचे असणार आहे.केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करून टप्प्याटप्प्याने गरजेनुसार प्रदर्शन केंद्र विकसित करण्याची कार्यवाही सुरू झाली. तीन टप्प्यांत आणि सुमारे पाच वर्षांचे नियोजन असून पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन व कन्व्हेंशन सेंटर विकसित करणे, जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे स्थान उंचावणे व महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे बळकटीकरण करणे, व्यापार संवर्धनासाठी आणि सेवा उद्योगाची इको-सिस्टीम मजबूत करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविणे या उद्देशाने प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. मास्टर प्लॅनमध्ये खुले प्रदर्शन केंद्र, प्रदर्शन हॉल, कन्व्हेंशन सेंटर आणि संग्रहालय, अग्निशमन केंद्र, प्रशासकीय इमारत, व्हीआयपी लाउंज, बस डेपो, बहुस्तरीय कार पार्क, व्यापारी केंद्र, हेलिपॅड, मेट्रो स्टेशन, तारांकित व बजेट हॉटेल, प्राथमिक शाळा, दवाखाने असणार आहेत. सीमा भिंत उभारण्याचे काम सुरू झाले आहे. प्रदर्शन केंद्राच्या भूखंडास सीमाभिंत बांधणे व ११ हेक्टर क्षेत्र सपाटीकरणाचे काम सुरू आहे. खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.- सतीशकुमार खडके,सीईओ, नवनगर विकास प्राधिकरण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड