शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पडताळणीऐवजी जागेवर प्रमाणपत्र

By admin | Updated: February 5, 2017 03:31 IST

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेकजण तयारीत असून, त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वच्छतागृह वापरासंबंधीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेकजण तयारीत असून, त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वच्छतागृह वापरासंबंधीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यावर हे प्रमाणपत्र दिले जाते. या नवीन नियमामुळे यंत्रणेवरील ताण वाढला असून, अधिकाऱ्यांना डोकेदुखी ठरली. मात्र, तर सर्वच ठिकाणी खरोखरच पाहणी करण्यात आली की, केवळ जागेवर बसूनच प्रमाणपत्रे देण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रमुख राजकीय पक्षांसह छोट्या पक्षांचे उमेदवार उतरले आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल २ हजार १४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांना अर्ज भरताना स्वच्छतागृह वापराचे प्रमाणपत्र घेऊन हे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक होेते. या प्रमाणपत्राची मागणी करण्यासाठी मनपाला लेखी स्वरूपात अर्ज द्यावा लागतो. अर्ज मिळाल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उमेदवाराच्या घरामध्ये अथवा परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर होतो की नाही, याची खातरजमा करावी लागते. त्यानंतरच हे प्रमाणपत्र द्यावे, असा नियम आहे. मात्र, यासाठी त्या तुलनेत यंत्रणाही उपलब्ध होणे गरजेचे आहे. उपलब्ध यंत्रणेवर ताण येत असताना हा नवीन नियम अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांची मदतमनपाच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या काही निवडणूक कक्षांमधून बसल्या जागेवरच ही प्रमाणपत्रेदिली गेल्याचे बोलले जात आहे. सोसायटी, इमारती, बंगल्यांचे पत्ते असतील, तर या घरांमध्ये वैयक्तिक शौचालये असणारच, असेच गृहीत धरले. यासोबतच जर झोपडपट्टी, वस्ती, चाळीमध्ये राहणाऱ्यांचे अर्ज आले, तर ते सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असतील असेही गृहीत धरण्यात येते. तसेच, माहितीसाठी कार्यकर्त्यांचीही मदत घेतली जात आहे.