शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

शिवजयंती उत्साहात

By admin | Updated: February 21, 2016 03:05 IST

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक संघटनांनी रॅली काढली. तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक संघटनांनी रॅली काढली. तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम झाले. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.आझाद मित्र मंडळ काळेवाडी येथील आझाद मित्र मंडळ स्पोटर््स क्लब व विनोद तापकीर फाउंडेशनच्या वतीने शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक विनोद नढे, माजी सरपंच ज्ञानेश्वर नढे, विनोद तापकीर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर नढे, काळुराम नढे, मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे, मुरलीधर ढगे, हरेश नखाते, राजू शिंदे, मयूर गवळी, श्याम नढे, अनिल क्षीरसागर, गजानन नढे, प्रदीप कासार, बाबासाहेब जगताप, ज्येष्ठ नागरिक अरुण बकाल, दशरथ वीर उपस्थित होते.शिवराय प्रतिष्ठानयेथील शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने मारुती नढे पाटील व प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नढे, नवनाथ नढे-पाटील, नगरसेवक विनोद नढे, माजी नगरसेवक संतोष कोकणे, रमेश नखाते, दिलीप काळे, सागर नढे, श्यामराव काळे, शिवाजी काळे, अमित बोरगे उपस्थित होते. नवयुवक मित्र मंडळतापकीरनगरमधील नवयुवक मित्र मंडळ व राज तापकीर युवा मंचाच्या वतीने शिवजयंतिनिमित्त मंडळाचे अध्यक्ष हरेश तापकीर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कुणाल साठे यांनी शिववंदना घेतली. या वेळी राज तापकीर, अनिल बिरादार, नीलेश मैंद, राम गायकवाड, स्वामी कडुंबन, राजदीप तापकीर, अजय वाकोडे, विनोद भिसे, अविनाश भंडारी, सार्थक मोकाशी, महेश भंडे उपस्थित होते. ओम साई ग्रुपतापकीरमळा चौकात ओम साई ग्रुप आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर, रूपेश तापकीर, संग्राम गवळी, नीलेश तापकीर, राहुल सावर्डेकर, रॉबिन फ्रान्सिस, बबलू शेख, भैया कांबळे, अशोक शेळके, अजित धारूरकर, नीलेश तोडकर व मंडळाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. देशभक्त क्रांतिकारी संघटनेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष संतोष कदम यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी भारतीय मायनारिटीज महासंघाचे अध्यक्ष मारुती कदम, रोहित भोरे, बाबासाहेब जगताप, श्यामराव वाकोडे, दीपक इंगळे, महेंद्र भोरे, सूरज वाघमारे, आकाश कदम, परशुराम नखाते, दीपक भोरे, दिनेश कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.निगडीत पोवाडानिगडी येथील पीएमपीएमएलच्या आगारातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर भगत भास्कर यांनी पोवाडा सादर केला. कामगारांना अल्पोपाहार देण्यात आला. या वेळी पीएमपीचे सुनील नलावडे, संतोष शिंदे, सचिन काळभोर, प्रफुल्ल शिंदे आदी उपस्थित होते. यशस्वी प्राथमिक विद्यालययशस्वी प्राथमिक विद्यालयामध्ये उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थी नदाफ शेख याने शिवाजीमहाराजांची वेशभूषा करून नव्या पिढीला शिवरायांची ओळख करून दिली. तेजल फापाळे हिने जिजाऊ मातेची भूमिका करून लहानपणी त्यांनी शिवबाला कसे घडविले, ते सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी मावळ्यांच्या भूमिकेत प्रदर्शन करून दाखवले. विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.अभिनव प्राथमिक विद्यालयजाधववाडी चिखलीतील अभिनव प्राथमिक विद्यालयाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजीमहाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे यांनी शिवजयंतीचे महत्त्व, शिवरायांचे पराक्रम, कर्तृत्व गुण स्पष्ट करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विकास जगदाळे यांनी इतिहासाचे महत्त्व स्पष्ट केले.आकुर्डी, विठ्ठलवाडी परिसरातील बाल मावळ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. माजी नगरसेविका सविता अशोक वायकर यांनी शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमासाठी साक्षी निम्हण, संदिनी गुप्ता, समीक्षा वायकर, तनवी घाडगे, दिव्या चौहाण, नेहा गौड यांनी परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी शहर महिलाध्यक्षा जयश्री क्षीरसागर, तसेच पुणे शहर सचिव शिवाजी शिंदे व कार्यकर्त्यांनी डांगे चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.