शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

घंटागाडी व कचराडेपोवर कचरा वेचकांना राख्या बांधून जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 19:44 IST

घंटागाडी व कचरा डेपो येथे कचरा गोळा करण्याचे काम करणार्‍या कामगारांना राख्या बांधत आँक्झिलियम काँन्व्हेंटच्या मुलींनी खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

लोणावळा : घंटागाडी व कचरा डेपो येथे कचरा गोळा करण्याचे काम करणार्‍या कामगारांना राख्या बांधत आँक्झिलियम काँन्व्हेंटच्या मुलींनी खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. कचरा गोळा करत शहराला स्वच्छ व सुंदर ठेवणारे स्वच्छता दूत हेच आमच्या शहरातील खरे हिरो आहेत असे म्हणत या मुलींनी कचरावेचक कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.बहिण भावाच्या पवित्र नाते संबंधांचे व प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे औचित्य साधत आज लोणावळ्यातील आँक्झिलियम काँन्व्हेंट या मुलींच्या शाळेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत घंटागाडीवर काम करणारे कामगार तसेच कचरा डेपोवरील कचरावेचक यांना राख्या बांधत हा सण उत्साहात साजर केला. या अनोख्या रक्षाबंधनाने भारावून गेलेल्या कर्मचार्‍यांनी शाळेकरिता भेट म्हणून एक घड्याळ दिले तर मुलींनी बिस्किट वाटप केले.लोणावळा शहराच्या स्वच्छता मोहिमेत आँक्झिलियम शाळेच्या मुलींनी कायम भरघोस कार्य केले आहे. कचरा गोळा करणारे कामगार दिवसरात्र स्वच्छतेचे काम करत असल्याने आज खरं तर आपले लोणावळा शहर स्वच्छ व सुंदर झाले असल्याने आमच्या दृष्टीने तेच खरे हिरो असल्याची भावना यावेळी शाळकरी मुलींनी व्यक्त केली. यावेळी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुलींनी कचरा डेपो दाखवत त्याठिकाणी कचर्‍यापासून तयार करण्यात येणारा बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प दाखवत माहिती देण्यात आली. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी कचरा डेपोवर करण्यात आलेल्या उपाययोजना व कचरा विलगीकरण याची माहिती मुलींना दिली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेविका आरोही तळेगावकर, सुर्वणा अकोलकर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, जयश्री आहेर यांनी कचराडेपोवर भेट देत मुलींनी स्वंस्फुर्तीने राबविलेल्या या रक्षाबंधन सामाजिक बांधिलकी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जाधव यांनी मुलींना कचरा घंटागाडीत वर्गीकरण करुन का द्यावे याचे महत्व पटवून दिले. येणार्‍या काळात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपरिषदेच्या सोबत काम करत शहरातील स्वच्छतेची ज्योत काम तेवत ठेवण्याचा संकल्प यावेळी आँक्झिलियमच्या शिक्षिकांनी व्यक्त केला.

टॅग्स :lonavalaलोणावळाRaksha Bandhanरक्षाबंधन