शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीमुळे नागरिकांचे हाल

By admin | Updated: April 1, 2017 01:49 IST

चऱ्होलीतील तापकीरनगर भागात अद्याप ड्रेनेज व्यवस्था उपलब्ध नसल्याने परिसरातील सांडपाणी रस्त्यावर सोडले जात

भोसरी : चऱ्होलीतील तापकीरनगर भागात अद्याप ड्रेनेज व्यवस्था उपलब्ध नसल्याने परिसरातील सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याचीच दाखल घेत नगरसेविका विनया तापकीर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या भागातील नागरिकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील नागरिकांना तत्काळ ड्रेनेजची कामे पूर्ण करून द्यावीत अशी मागणी या वेळी तापकीर यांनी केली. चऱ्होली भागात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या सेवा अपूर्ण पडत असून काही परिसरात मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवतो. ड्रेनेजअभावी सांडपाणी रस्त्यावर जागोजागी साचते. त्यामुळे परिसरात डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त आहेत. याचीच पाहणी करण्यासाठी नागसेविका विनया तापकीर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांनी महापालिका प्रशासन अधिकारी भोसले, गवळी व शितोळे यांना तापकीरनगर परिसरातील परिस्थिती दाखवली. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच लवकरात लवकर या भागात ड्रेनेज व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)तापकीरनगर भागात सुमारे १०० घरे असून, या भागात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे म्हणून भविष्याचा विचार करता येथे सर्व मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. ड्रेनेज व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव सांडपाणी इतरत्र सोडावे लागते. त्यामुळे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तत्काळ येथील ड्रेनेजची कामे पूर्ण करावीत अन्यथा आम्ही नागरिकांसह जनआंदोलन करून आमच्या समस्या मांडणार आहोत. - विनया तापकीर, नगरसेविका