शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

फोर जीच्या जमान्यातही ‘कॉल’ वेटिंगवर, भारतीय दूरसंचार प्राधिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:10 IST

जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत.

- विशाल शिर्केपुणे : जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत. देशाने देखील फाईव्ह जीची तयारी सुरु केली आहे. असे असतानाही अजूनही आपण कॉलची रेंज अखंडितपणे देण्यासाठी झटत असल्याचे वास्तव आहे.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय) दिलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. पूर्वी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या जाहिराती या येणारे आणि जाणारे कॉल दर किती याबाबत बोलत असत. गेल्या सतरा वर्षांत टप्प्याटप्प्याने येणारे आणि जाणाºया कॉलचे दर कमी होत आता ते फुकट झाले आहेत. आता इंटरनेटमुळे मोबाईल सेवेत क्रांती आली आहे.इंटरनेटच्या जमान्यात मोबाईल गेला असला, तरी या सेवेची प्राथमिकता असलेली कॉल सेवा अजूनही बाळसे धरताना दिसत नाही. अनेक भागात मोबाईलचा सिग्नल कमकुवत असणे, कॉल ड्रॉप होणे, कॉल न लागणे अथवा सेवेत अडथळा येणे अशा प्रकारच्या समस्यांना ग्राहक सामोरे जात आहेत. त्यातही सेवेत अडथळा निर्माण होणे आणि मोबाईल सिग्नल कमकुवत असणे याचा वाटा निम्मा आहे. हे चारही प्रकार मोबाईल कॉल व्यवस्थित न लागण्याशीच आहेत. त्यातही सिग्नल पुरेसा न मिळणे अथवा सेवेत व्यत्यय येणे हा प्रकार निश्चितच चांगले निदर्शक नाही. देशातील प्रमुख दोन कंपन्या असलेल्या एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांच्या तक्रारीची आकडेवारी पाहिल्यास त्यावरुन अंदाज येऊ शकेल. जानेवारी ते ३१ सप्टेंबर २०१७ अखेरीपर्यंत सेवेत अडथळा येत असल्याच्या ५३४ तक्रारीएअरटेल विरोधात, तर १८४ तक्रारी आयडिया विरोधात ट्रायकडे दाखल झाल्या आहेत.सिग्नल कमकुवत असल्याच्या ६५५ तक्रारी एअरटेल अणि ७८ तक्रारी आयडियाच्या दाखल झाल्या. रिलायन्स जीओचे सेवेत अडथळा आणि सिग्नल कमकुवत असल्यायाचे प्रमाण अनुक्रमे १३० आणि १६०, तर व्होडाफोनचे ४५२ व ३३२ इतके आहे. माहिती अधिकार कार्यकर्तेप्रफुल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.अनेक मोठाले टॉवर उभारून मोबाईल कॉलमध्ये जाणवणाºया त्रुटी सुधारणार नाहीत. त्यासाठी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या हार्डवेअरची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. अद्ययावत हार्डवेअर नसल्यानेच मोबाईल कॉलच्या संदर्भात विविध त्रुटी सध्या जाणवत आहेत. मोबाईल कंपन्यांचे कालबाह्य हार्डवेअर सुधारल्यास हा प्रश्न सुटू शकेल.- आदित्य अभ्यंकर, विभागप्रमुख, तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठप्राधिकरणाकडील दाखल तक्रारी त्रुटी दर्शवणाºयादेशात कोट्यवधी ग्राहक मोबाईल वापरतात. त्या तुलनेत तक्रारींचा शेकड्यातील आकडा अगदीच अत्यल्प वाटू शकतो. मात्र या सर्व तक्रारी अत्यंत त्रस्त झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून वापरणाºया ग्राहकांची संख्या आहेत. त्यातही अशा प्रकारे भारतीय नियामक प्राधिकरणाकडे जाऊ शकणारे सुशिक्षितांमध्येही अत्यंत थोडे असतात. सामान्य ग्राहकांची धाव ही संबंधित मोबाईल कंपन्यांच्या कॉल सेंटरपर्यंतच असते. त्यामुळे प्राधिकरणाकडेदाखल होणाºया तक्रारी या सेवेतील त्रुटी दर्शविणाºया मानल्या जातात.ट्रायकडे जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ मध्ये दाखल तक्रारी(कंसात २०१६ची जानेवारी ते डिसेंबरची आकडेवारी)तक्रारीचा प्रकार बीएसएनएल एअरटेल आयडिया जीओ व्होडाफोनसेवेतील अडथळा ३५ (३८) ५३४ (२३०) १८४ (१८४) १३० (३) ४५२ (४२६)खराब सिग्नल ३९ (४३) ६५५ (७६७) ७८ (९६) १६१ (९) ३३२ (३११)कॉल ड्रॉप ०६ (२२) १५८ (२३०) ३९ (७४) २० (१) ६९ (१३४)डिसकनेक्शन ०१ (१) ३८ (४४) १८ (२१) १७ (२) ५० (४३)

टॅग्स :Mobileमोबाइल