शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

गाजर, मिरची महाग, पालेभाज्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:50 IST

मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.

पिंपरी : येथील लाल बहाद्दूरशास्त्री भाजी मंडईत रविवारी पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.रताळी ४० ते ५० प्रतिकिलो तर भुईमुगाच्या शेंगा ६० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात वटाण्याची आवक झाल्यामुळे वटाण्याचे भाव ५० टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र या आठवड्यात मटारचे भाव थोड्याप्रमाणात वाढून ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. गेल्या आठवड्यात आवक वाढल्यामुळे मटारचे भाव ४० ते ५० रुपये झाले होते. शेवगा, गवार व श्रावणी घेवडा यांचे दर स्थिर होते. त्याचप्रमाणे टोमॅटो, पावटा, वाल यांचे भावात प्रतिकिलो १० रुपयांनी झालेली वाढ या आठवड्यात ही तशीच होती. कोथिंबीर व मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे त्यांचे भाव कमी झाले होते. कोथिंबीर व मेथी ७ ते ८ रुपये दराने विकली जात होती.भाज्यां प्रमाणेच फळांचे ही दर तुलनेने कमी झाले आहेत. आंब्याचा हंगाम संपत आल्यामुळे आंब्यांचे दर वाढले आहेत. आंबा १०० रुपये किलो दराने विकले जात होते.

पालेभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे:कोथिंबीर : ७ ते ८, मेथी : ७ ते ८, शेपू : १०, पालक : १०, मुळा : २०, कांदापात : २०, तांदुळजा : १०, पुदिना : ५, चुका : २०.फळांचे भाव पुढीलप्रमाणे :सफरचंद : १६० ते २००, आंबा : १००, पेरू : ४० ते ८०, सीताफळ : ४० ते १००, पपई : ३० ते ५०, डाळींब : ३० ते १००, मोसंबी : ६०, संत्री : १००, किवी : ६० ते ८० (३ नग), ड्रॅगन फ्रुट : ६० (१ नग), पिअर : १००, १६० (परदेशी).फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो)बटाटे : २० ते २२, कांदे : २२, टोमॅटो : ३०, गवार : ३५ ते ४०, दोडका : ३५ ते ४०, घोसाळी : ४०, लसूण : ४०, आले : ७०, भेंडी : ४० ते ५०, वांगी : ४०, कोबी : २५ ते ३०, फ्लॉवर : ४०, शेवगा : ५० ते ६०, हिरवी मिरची : ५० ते ६०, शिमला मिरची : ५०, पडवळ : २५ ते ३०, दुधी भोपळा : २५ ते ३०, लाल भोपळा : ४० ते ५०, काकडी : ३० ते ४०, चवळी : ४०, काळा घेवडा : ७०, तोंडली : ४०, गाजर : ५०, वाल : ४०, राजमा : ५० ते ६०, मटार : ७० ते ८०, कारली : ४०, पावटा : ६०, श्रावणी घेवडा : ८०, लिंबू : ४० ते ५० (शेकडा).उपवासामुळे रताळ्याला मागणीसांगवी : आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांसह फळांना मागणी वाढली आहे. सांगवीत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात रविवारी रताळी, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा आदींना मागणी होती. त्यामुळे त्याचे दरही वधारल्याचे दिसून आले. रताळी ६० रुपये किलो तर भुईमुगाच्या शेंगा ८० रुपये किलो होत्या. फळांचेही दर चढेच होते. केळी ६० रुपये डझन तर सफरचंद प्रतिकिलो २०० रुपये दर होता. दर चढे असले तरी, ग्राहकांकडून या फळांची आणि उपवासाच्या पदार्थांसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. साबुदाणा, वरईचीही खरेदी करण्यात येत होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड