शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडमध्ये इमारतीत मेणबत्तीमुळे आग

By admin | Updated: May 4, 2017 02:28 IST

येथील आबूशेठ रस्त्यावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने वीजपुरवठा खंडित झाला असल्याने मेणबत्ती

देहूरोड : येथील आबूशेठ रस्त्यावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने वीजपुरवठा खंडित झाला असल्याने मेणबत्ती पेटवून खिडकीत ठेवली असताना मेणबत्ती पडून आग लागल्याने समोरासमोरच्या दोन खोल्यांत राहणाऱ्या दोन कुटुंबांच्या घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. तर दुसऱ्या कुटुंबातील एका महिलेला आगीचा व धुराचा त्रास सहन न झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक, तसेच आबूशेठ रस्त्यावरील व्यापारी बांधवांनी प्रयत्न केल्याने एका तासात आग आटोक्यात आली. आगीची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली. आयेशा आत्तार (वय अंदाजे २८) असे उपचार घेत असलेल्या महिलेचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हरी निवास या कैलास गुप्ता यांची दुमजली इमारतीच्या मजल्यावर सरोदे व आत्तार हे भाडेकरू राहतात. दुपारी चारपासून देहूरोड व विकासनगर परिसरात विजेचा लपंडाव सुरु होता. सायंकाळी पुन्हा वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्री साडेसात-आठच्या सुमारास अनिता राहुल सरोदे (वय २५) या महिलेने खोलीच्या खिडकीत मेणबत्ती लावली होती . त्या तळमजल्यावर तांदूळ खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना मेणबत्ती खाली पडल्याने आग लागली असल्याचे दिसले. आगीमुळे घरातील दूरदर्शन संच, तसेच कपडे व घरसामान जळत होते. समोरच असलेल्या आत्तार राहत असलेल्या खोलीतील घरसामान व कपड्यांनी पेट घेतला. आत्तार यांना त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (वार्ताहर)