दिघी : प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदार गाठीभेटी, मतदार संवादावर भर दिला आहे. मतदारांशी संवाद साधून उमेदवार अडीअडचणी जाणून घेत आहेत. या वेळी विविध सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. साई पार्क येथे अजित पवार यांची सभा झाली.प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत इंगळे , बाळू लांडे, वृषाली झपके, कल्पना वाळके यांनी समर्थनगर, गायकवाडनगर, दत्तगडनगर परिसरात पदयात्रा काढली. प्रभागातील विविध भागात पदयात्रा, कोपरा सभा, वैयक्तिक संवाद साधण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. या वेळी उमेदवारांनी दिघी परिसरातील नागरिकांना भेट दिली. मतदान जागृती केली. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सहज उपलब्ध झाल्या असून, पक्षाच्या माध्यमातून हा विकास यापुढेही कायम राहायला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या वेळी चंद्रकांत वाळके, उषा शेळके, मनीषा जठार, सारिका भोसले, भाग्यश्री गोडसे, विकास परांडे, अरविंद लोखंडे, समाधान कांबळे, धनाजी खाडे, समीर झपके, उमेश वाळके, ओंकार घुले, पांडुरंग घुले, राहुल गावडे, मंदाताई झपके आदी उपस्थित होते. ‘‘गेल्या १५ वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलून विकास साधण्याचे काम माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या दूरदृष्टी व पारदर्शक कारभारामुळेच झाले आहे.’’ (वार्ताहर)
उमेदवारांनी साधला मतदारांशी संवाद
By admin | Updated: February 15, 2017 02:09 IST