शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बस स्थानक की जाहिरात केंद्र, राजरोसपणे चिकटविली जातात पत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:32 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील पीमपीएलच्या अनेक बसथांब्यांवर जाहिराती चिकटविल्या जात आहेत. त्यामुळे बसथांब्यांचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येते.

सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरातील पीमपीएलच्या अनेक बसथांब्यांवर जाहिराती चिकटविल्या जात आहेत. त्यामुळे बसथांब्यांचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येते. शहरात पीएमपी या सार्वजनिक बस सेवेचे मोठे जाळे आहे. शहरासह लगतच्या गावांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना या बसेसचा मोठा आधार असतो. विविध मार्गांवर धावणाºया या बसेससाठी ठिकठिकाणी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. या थांब्यांवर प्रवाशांना बसण्यासाठी शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही ठिकाणचे शेड मोडकळीस आले आहेत. तर काही ठिकाणी नवीन करकरीत शेड उभारले आहेत. मात्र, जुने शेड असो अथवा नवीन या शेडवर विविध प्रकारच्या जाहिराती चिकटविलेल्या दिसून येत आहेत. बसथांब्यावर जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी जाहिरात लावलेली असते. यामुळे बसथांब्यांचे विदु्रपीकरण झाले आहे.सांगवीतील नवी सांगवी आणि जुनी सांगवी तसेच पिंपळे गुरव येथील मुख्य बस स्थानक परिसरातील प्रत्येक थांब्याकरिता असलेल्या बस स्थानकांची स्थिती सारखीच दिसून येते. निगडीतील लोकमान्य टिळक चौकात असलेल्या बस स्थानकावरही अशाच प्रकारे विविध जाहिराती चिकटविलेल्या दिसून येतात. हीच स्थिती पिंपरी, चिंचवड, भोसरी, तळवडे, कासारवाडी, नेहरुनगर, रावेत, रहाटणी, वाकड, थेरगाव आदी ठिकाणी पहायला मिळत आहे.विनापरवानगी जाहिराती चिकटविणे बेकायदेशीर आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र विभाग आहे. तरीही सर्रासपणे ठिकठिकाणी जाहिरती झळकत असतात. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.या जाहिराती स्थानिक असल्याचे येथील लावलेल्या जाहिरातीतून दिसून येते. त्यावर असलेल्या फोन क्रमांकावर संपर्क करून पालिकेकडून कारवाई केल्यास अशाप्रकारे बस स्थानक विद्रूप करणाºयांना चाप बसेल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पालिकेकडून अशा अनधिकृत जाहिराती लावणाºयांविरोधात कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.या जाहिरातीमुळे शेडचा मूळ रंगही लवकर लक्षात येत नाही. काही ठिकाणी तर अक्षरश: एकावर एक आठ ते दहा जाहिराती चिकटविलेल्या असतात. यासह जुन्या अनेक दिवसांपूर्वीच्या जाहिरातीही महिनोनमहिने तशाच झळकत असतात. या बेकायदेशीर जाहिराती हटविण्याबाबतची तसदी संबंधित यंत्रणेकडून घेतली जात नाही. त्यामुळे बसथांब्याच्या विदु्रपीकरणात भर पडत आहे.सध्या शहरात ठिकठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या काही बस स्थानकांवर संबंधित बस स्थानकावरून जाणाºया बसेसचे वेळापत्रक लावले आहे. त्यावर बसची वेळही नमूद असते. यामुळे प्रवाशांची सोय होते. मात्र, काही बहाद्दरांनी या वेळापत्रकावर देखील जाहिराती चिकटविल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसचे वेळापत्रक न समजल्याने धांदल उडते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड