शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांना अडसर क्लिष्ट नियमावलीचा

By admin | Updated: November 22, 2015 03:35 IST

चार दिवसांपूर्वीच शासनाने तुकडाबंदी कायद्यात सुधारणा केली आहे. यामुळे नागरी क्षेत्रात गुंठा-अर्धा गुंठा जमीन खरेदी करणे शक्य होणार आहे. असे असले, तरी महापालिकेच्या क्लिष्ट

- मंगेश पांडे,  पिंपरी चार दिवसांपूर्वीच शासनाने तुकडाबंदी कायद्यात सुधारणा केली आहे. यामुळे नागरी क्षेत्रात गुंठा-अर्धा गुंठा जमीन खरेदी करणे शक्य होणार आहे. असे असले, तरी महापालिकेच्या क्लिष्ट बांधकाम नियमावलीमुळे बांधकाम करणे अडचणीचे आहे. तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यास शासनाने मंजुरी दिल्याने गुंठा-अर्धा गुंठा जमीनधारकांना दिलासा मिळाला आहे. तुकडाबंदी कायद्यामुळे किमान ११ गुंठे जागा खरेदी करणे बंधनकारक होते. त्यामुळे सामान्य नागरिकाला घरासाठी गुंठा, अर्धा गुंठा जागा घेण्यास अडचण येत होती. ज्यांनी गुंठा, अर्धा गुंठा जागा घेतल्या. त्यांची सातबारा व अन्य दस्तऐवजावर नोंद होत नव्हती. पुढे बांधकाम परवानगी मिळविणे अडचणीचे ठरत होते. आता छोट्या आकारातील भूखंड खरेदी करणे शक्य झाले आहे. मात्र, जागा खरेदी केल्यानंतरही क्लिष्ट बांधकाम नियमावलीमुळे त्यावर बांधकाम करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे महापालिकेने गुंठा, अर्धा गुंठा जागेतील बांधकामासाठी नियमावलीत शिथिलता आणावी. तरच या कायद्यातील सुधारणेचा उपयोग होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केल्याने गुंठा-अर्धा गुंठा जागा खरेदी करता येणार आहे. यासह अशा छोट्या भूखंडांवरील मालमत्तांची मालकी निश्चित होणार आहे. मात्र, हा नियम कोणत्या तारखेपासूनच्या जमीनखरेदीला लागू होणार याबाबतची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम असून, आपल्या जागेला याचा फायदा होईल का, याची उत्सुकता आहे. क्लिष्ट नियमावलीमुळे बांधकाम करणे अवघड होणार आहे. त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे. बांधकाम होण्यासाठी नियमावलीत सुधारणा करणे गरजेचे आहे. पण प्रशासनाकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.छोटे भूखंड झाले सोयीचे; मात्र बांधकाम करणे ठरतेय अडचणीचे अशी भावना नागरिकांमध्ये झाली आहे. कमी क्षेत्रफळाच्या जागेत बांधकाम करता येणे शक्य असले, तरी त्यासाठीची बांधकाम परवानगीची प्रक्रिया किचकट असल्याने छोट्या भूखंडावर खरेच आपले घर उभे राहील का, अशी शंका शहरवासीयांच्या मनात आहे. सध्या महापालिकेकडून बांधकामांना घ्यावी लागणारी परवानगीची प्रक्रिया किचकट स्वरूपाची आहे. ही प्रक्रिया करताना संबंधित नागरिक मेटाकुटीस येतो. दरम्यान, त्याच्याकडून अनधिकृत बांधकामही उभारले जाते. कमी क्षेत्रातील जागेत बांधकाम करण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी सामासिक अंतर सोडल्यानंतर बांधकामासाठी कमीतकमी जागा शिल्लक राहते. यासह परवानगीसाठी फाइल दिल्यास विविध कारणांनी अडविली जाते. त्यामुळे उशीर होत जातो. ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडणे अपेक्षित असते. मात्र, तसे होत नाही.महापालिकेने बांधकाम परवानगी देताना नियमात शिथिलता आणल्यास गुंठा-अर्धा गुंठा जागेत अधिकृत बांधकामे उभी राहतील. यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसेल. पर्यायाने नंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची गरजच भासणार नाही.