शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात जुन्या योजना

By admin | Updated: December 23, 2016 00:43 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने घाईघाईने अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ३६८ कोटी ९० लाख रकमेचा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने घाईघाईने अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ३६८ कोटी ९० लाख रकमेचा हा अर्थसंकल्प असून, त्यात ३३३ कोटी ८० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच ३५ कोटी १० लाख रूपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. त्यात नवीन योजनांचा अभाव असून, जुन्याच योजना मागील पानावरून पुढे आल्या आहेत.प्राधिकरण सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम होते. त्यात २०१७ - १८ चा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी रमेश कुलगोड यांनी हा अर्थसंकल्प तयार केला आहे. सभेमध्ये चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. ३६८ कोटी ९० लाख रकमेचा हा अर्थसंकल्प असून त्यात ३३३ कोटी ८० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. ३५ कोटी १० लाख रुपयांची शिल्लक दर्शविली आहे. जमा तपशिलामध्ये आरंभीची शिल्लक ३०२ कोटी ४० लाख असून त्यात महसुली जमा २४ कोटी ७३ लाख रुपये, तर भांडवली जमा ४१ कोटी ७३ लाख रुपये आहे. त्यात विविध पेठांमधील भूखंड विक्रीतून २५ कोटी, अतिरिक्त अधिमूल्य आणि हस्तांतरण शुल्कातून ८ कोटी ४७ लाख, विकास निधी व व्याजातून ६ कोटी आणि ठेवीवरील व्याजातून २१ कोटी रुपये तसेच ठेकेदारांच्या ठेवीमधून १ कोटी ५३ लाख रुपये जमा अपेक्षित आहे. खर्चाच्या तपशिलात महसुली खर्चासाठी ३३ कोटी १५ लाख, भांडवली खर्चासाठी ३०० कोटी ६४ लाख रक्कम प्रस्तावित आहे. विविध विकास कामांसाठी १०३ कोटी ५६ लाख, आस्थापनेचा खर्च ११ कोटी ५० लाख, उद्यान, पर्यावरण, सुधारणा व शहरी वनीकरणासाठी २० कोटी ८२ लाख, अभियांत्रिकी विभागाकडील कामांसाठी १०३ कोटी ९ लाख रुपयांची तरतूद आहे.विकासकामांमध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी ३४ कोटी ८० लाख, पेठ क्रमांक ३० मधील गृहयोजनेसाठी ५४ कोटी १० लाख, वाल्हेकरवाडी, भूखंड गृहयोजनेसाठी ५४ कोटी १० लाख, रस्त्याच्या कामांसाठी ४९ कोटी २० लाख, साई चौकातील उड्डाणपुलासाठी १४ कोटी, भूसंपादनासाठी ७० कोटी तर पर्यावरण सुधारणा कामासाठी २० कोटी ८२ लाख आणि विद्युतीकरणासाठी २३ कोटी ७० लाखांची तरतूद आहे.(प्रतिनिधी)