शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Budget 2019: नोकरदार वर्गात खुशी; औद्योगिक परिसरात गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 02:23 IST

निवृत्त, शेतकऱ्यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत

पिंपरी : केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला. त्यावर पिंपरी-चिंचवड परिसरातील नोकरदार, शेतकरी कामगार वर्गाने समाधान व्यक्त केले असून, औद्योगिक परिसराने नाराजी व्यक्त केली आहे. असंघटित कामगार संघटना, निवृत्त पेन्शनरने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.केंद्र सरकारने आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये कामगार, नोकरदार वर्गास करसवलत दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे साडेसहा हजार कंपन्या आहेत. त्यामुळे देशातील कानाकोपºयातून मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी शहरात नागरिक दाखल झाले आहेत. नोकरदार वर्गाला पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याचा फायदा होणार आहे. तसेच बॅँका तसेच पोस्ट आॅफिसमधील ठेवींवरील व्याजावरील करकपातीची मर्यादा दहा हजार रुपयांवरून चाळीस हजार रुपयांवर नेली आहे.तसेच २१ हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटित कामगारांना सात हजार रुपये बोनस देणार आहे. तसेच पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात दोन टक्क्यांची सवलत दिली आहे. तसेच किसान सन्मान निधी योजनेसाठी पंचाहत्तर कोटी आहे.कामधेनू योजना सुरू करणार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील १२ कोटी शेतकºयांना लाभ मिळणार, तसेच दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार आहे. या विषयी कामगार, नोकरदारवर्ग, सामान्य नागरिक, शेतकरी, आयटी अधिकारी, असंघटित कामगार संघटना, निवृत्त कर्मचारी यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. मात्र, औद्योगिक परिसरातून काहीसा नाराजीचा सूर आहे. तसेच सत्ताधारी पक्षाने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. मात्र, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, काँग्रेसने अर्थसंकल्पाबाबत नाराजीचा सूर उमटविला आहे.कष्टकरी, कामगार, शेतकरी, नोकरदार वर्गासाठी अत्यंत चांगला असा अर्थसंकल्प आहे. सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. करमर्यादा अडीचवरून पाच लाख केल्याने नोकरदारवर्गास फायदा होणार आहे.- लक्ष्मण जगताप, आमदार, शहराध्यक्ष, भाजपामोदी सरकारने समाजातील सर्व घटकांचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर नोकरदारवर्ग आहे. करमर्यादा अडीचवरून पाच लाख केल्याने मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्गास फायदा होणार आहे.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेतेअर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्ववर्गाला डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी आहेत. अंतरिम बजेट आहे. औद्योगिक विभागासाठी विविध घोषणा केल्या आहे. त्या प्रत्यक्षात उतरणे आवश्यक आहे.- योगेश बाबर, शहरप्रमुख शिवसेनाआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सादर केलेले हे ‘जुमला’ बजेट आहे. यामधून शेतकºयांना कसलाही फायदा होणार नाही. तसेच कामगारांबाबतही ठोस निर्णय झालेला नाही.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस, पिंपरी-चिंचवड शहरकेंद्रीय अर्थसंकल्पातून फसवणूक झाली आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. गोलमाल करणारा अर्थसंकल्प आहे. मेपर्यंतचे नियोजन करण्याचा सरकारला अधिकार आहे. तरीही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेसकेंद्र सरकारचा निवडणुकीचा जाहीरनामा आहे. अर्थसंकल्प अव्यवहार्य आहे. जो पैसा खर्च करू असे म्हटले आहे तो पैसा येणार कोठून हे सरकारलाच माहीत नाही. उत्पादन आणि धननिर्मिती क्षमता वाढली की नाही हे न पाहता फुकटपणाची खैरात केली आहे.- सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड