शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरटीएस’ म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण

By admin | Updated: May 26, 2017 06:07 IST

निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटीएस म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण आहे. अनेक जणांचे जीव या मार्गामुळे जात आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटीएस म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण आहे. अनेक जणांचे जीव या मार्गामुळे जात आहेत. असे असतानाही महापालिकेतर्फे बीआरटीएसबाबत गोलमेज परिषद आहे. हा प्रकार म्हणजे शहरवासीयांची फसवणूक असून, महापालिका प्रशासनाचे बौद्धिक दिवाळे निघाल्याचे लक्षण आहे. निगडी- दापोडी बीआरटीएस मार्गाला सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे याबाबत अमोल थोरात यांनी निवेदन दिले आहे. थोरात म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेतर्फे बीआरटीएस प्रकल्प राबविण्यात येत आहे. निगडी-दापोडी दरम्यानही बीआरटएस मार्ग उभारला आहे. मात्र, काही वर्षांपासून या मार्गाला सातत्याने विलंब करण्यात येत आहे. तांत्रिक त्रुटी पुढे करून महापालिकेचे संबंधित अधिकारी वेळ मारून नेत आहेत. यातून केवळ काही ठेकेदारांचे हित साधण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या कामात अनेक त्रुटी दाखवत आणि या मार्गाच्या कामाला विलंब करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. परिणामी या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले.