शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चक्रेश्वर मंदिराकडे जाणारा पूल खचला

By admin | Updated: February 20, 2017 02:16 IST

येथील बलुत आळीकडून चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाजवळील रस्त्यालगतचा भाग खचल्याने

पुणे : चाकण (ता. खेड) येथील बलुत आळीकडून चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाजवळील रस्त्यालगतचा भाग खचल्याने हा पूलच ढासळण्याच्या अवस्थेत आहे. या पुलाच्या बाजूपट्ट्या खचत चालल्याने धोकादायक ठरत आहेत. पुलावर संपूर्णपणे नवीन लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याची आणि पुलाजवळील खचलेल्या भागात भराव टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. हा पूल रहदारीला धोकादायक असल्याने पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. चर्मकारवस्तीपासून पुढे ओढ्यावरील पुलावरून जाणारा रस्ता चाकण चक्रेश्वर रस्त्याला जोडला जातो. हाच रस्ता पुढे चाकण-शिक्रापूर रस्त्यावर जाण्यास सोयीचा असल्याने या पुलावरून अनेक वाहनांची वर्दळ असते. पूल अरुंद असून त्यावरील संरक्षक लोखंडी पाइप तुटलेले आहेत. या रस्त्यावरील संबंधित पुलाजवळ नागमोडी वळण आहे. धक्कादायक म्हणजे पुलालगतच्या भागात सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग खचला आहे. त्यामुळे सिमेंटचा रस्ता खालून पोकळ झाला आहे. त्यातच मोठ्या वाहनांच्या रहदारीने पूलसुद्धा खचत चालला आहे. रात्रीच्या वेळी या धोकादायक भागाचा अंदाजच येत नाही. त्यामुळे येथून एखादे वाहन खाली ओढ्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या रस्त्यावरील धोकादायक नागमोडी वळण काढून संपूर्णपणे नवीन पूल बांधण्यासाठी नगर परिषदेने प्रयत्न करण्याची मागणीही परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.नागरिकांत नाराजी या पुलावरून विद्यार्थी, नोकरदार, चक्रेश्वर मंदिराकडे जाणारे भाविक आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रा यांची नेहमी वर्दळ असते. संबंधित पुलाच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. चाकण नगर परिषदेने लक्ष देऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील रहिवासी व यंग जॉली क्लब मंडळाचे संतोष वाव्हळ, राजेंद्र जगनाडे यांनी केली आहे.