शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांच्या प्रस्तावाला ब्रेक

By admin | Updated: March 25, 2015 00:21 IST

मोठया सोसायटयांचा किचन आणि बाथरूम मधून निघणारे पाणी (ग्रे वॉटर) स्वतंत्र जलवाहीने द्वारे संकलीत करून त्यावर प्रक्रीया करण्याचा प्रस्ताव उपमहापौर आबा बागूल यांनी ठेवला होता.

पुणे : मोठया सोसायटयांचा किचन आणि बाथरूम मधून निघणारे पाणी (ग्रे वॉटर) स्वतंत्र जलवाहीने द्वारे संकलीत करून त्यावर प्रक्रीया करण्याचा प्रस्ताव उपमहापौर आबा बागूल यांनी ठेवला होता. मात्र, एकाच प्रभागात असतानाही, या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात न आल्याने या प्रस्तावास स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी ब्रेक लावला आहे. हा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीत मान्यतेसाठी आल्यानंतर कदम यांनी स्वत:च त्यावर अक्षेप घेतल्याने या वरून महापालिकेत प्रभागातील वाद स्थायी समितीत पोहचल्याची चर्चा रंगली आहे. तर या प्रस्तावाबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर तसेच या प्रकल्पामुळे केवळ काही मोजक्याच सोसायटयांचा प्रश्न सुटणार असल्याने त्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी हा प्रस्ताव पुढे ढकण्यात आल्याचा खुलासा कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.प्रभाग क्रमांक ६७ मधून उपमहापौर बागूल आणि स्थायी समिती अध्यक्षा कदम महापालिकेवर निवडून आलेल्या आहेत. या प्रभागात प्रायोगिक तत्वावरील तब्बल ३ कोटी ९१ लाख रूपयांचा ग्रे वॉटर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बागूल यांनी दिला होता. त्यानुसार, प्रशासनाकडून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होत्या. त्यानुसार, बागूल उद्यान ते फुपाखरू उद्यान या आंबील ओढयाच्या कडेला असलेल्या काही सोसायटयांमधील ग्रे वॉटर स्वतंत्र जलवाहीनी द्वारे बागूल उद्यानात संकलीत करून त्यावर त्या ठिकाणी प्रक्रीया केली जाणार आहे. मात्र, हा प्रकल्प संपूर्ण प्रभागासाठी असताना, प्रत्यक्षात हा केवळ बागूल यांच्या सांगण्यानुसार ठेवण्यात आला, तसेच आपणही त्या प्रभागाच्या सदस्या असताना, आपल्या कोणतीही विचारणा करण्यात आली नाही. याबाबत कदम यांनी समितीच्या बैठकीतच नाराजी व्यक्त केली. तसेच या ठिकाणी सोडल्या जाणा-या पाण्याच्या दूर्गंधीमुळे नागरीक त्रस्त असल्याने त्याबाबत आपण वारंवार उपाय योजना करण्याच्या सूचना देऊनही अद्याप काहीच हालचाली होत नाही आणि हा प्रस्ताव लगेच तयार केला जातो याबाबतही कदम यांनी अधिका-यांना धारेवर धरले. तसेच हा प्रस्ताव एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार, हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. (प्रतिनिधी)प्रभागातील वाद उपमहापौर आबा बागूल यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांना काहीच माहिती नसल्याने त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. बागूल व कदम एकाच प्रभागातील असल्याने हा वाद समोर आला.