शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तहसीलदारांची खुर्चीसाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:59 IST

मावळच्या तहसीलदारपदी रणजित देसाई यांची नियुक्ती झाली होती.कार्यकाळ संपायला अजून अवधी असताना लोकसभेच्या निवडणुकीचे कारण दाखवून त्यांची सहायक अन्यधान्य पुरवठा अधिकारी म्हणून सोलापूरला २० फेब्रुवारीस बदली केली.

वडगाव मावळ : मावळ तहसीलदारच्या खुर्चीवर मीच बसणार, यासाठी दोन तहसीलदारांची चढाओढ सुरू झाली आहे. एकमेकांविरुद्ध न्यायालयात धाव घेतल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तहसीलदारांची खुर्ची रिकामी आहे.

मावळच्या तहसीलदारपदी रणजित देसाई यांची नियुक्ती झाली होती.कार्यकाळ संपायला अजून अवधी असताना लोकसभेच्या निवडणुकीचे कारण दाखवून त्यांची सहायक अन्यधान्य पुरवठा अधिकारी म्हणून सोलापूरला २० फेब्रुवारीस बदली केली. त्यांच्या जागी वैशाली वाघमारे यांची नियुक्ती झाली. वाघमारे यांनी २० तारखेलाच पदभार स्वीकारला. अन्यायकारक बदली झाल्याने देसाई यांनी मॅटकडे धाव घेतली. तेथे त्यांना स्थगिती मिळाली. त्यामुळे देसाई हे पुन्हा पदभार स्वीकारतील असे वाटत असताना वाघमारे यांनी मॅट न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या दोन तहसीलदारांच्या वादात ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठवड्याभरापासून पद रिक्त असल्याने तहसीलदाराविना नागरिकांची महत्त्वाची कामेरखडली आहेत.

सोन्याचे अंडे देणारा तालुकामावळ तालुका सोन्याचे अंडे देणारा तालुका असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचा समज आहे. विविध खात्यांतील शासकीय अधिकारी या ठिकाणी पोस्टिंग घेण्यासाठी लाखो रुपये मोजतात. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे असल्याने ते कारण पुढे करून कार्यकाळ पूर्ण न होताच बदल्या केल्या गेल्यात. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह विविध खात्यांतील अधिकारी त्रस्त आहेत. काही अधिकारी यांनी झालेल्या बदल्यांबाबत स्थगिती आणली. येत्या दोन दिवसांत पोलीस अधिकारी यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा आहे. त्याची जागा घेण्यासाठी राजकीय आश्रय घेऊन अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे.