शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा चलनात आणणारे दोघे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:16 IST

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली.

पिंपरी : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक करून खडकी न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोडी येथे फळविक्रेत्याला पाचशेची नोट दिली. ५० रुपयांची फळे विकत घेऊन ४५० रुपये परत मागितले. फळविक्रेता सुटे पैसे घेण्यासाठी आजूबाजूच्या दुकानदारांकडे पाचशेची नोट घेऊन गेला. मात्र नोट बनावट असल्याचा संशय येताच त्यांनी सुटे पैसे देण्यास नकार दिला. त्या वेळी नोट बनावट असल्याचे फळ विक्रेत्याच्या लक्षात आले. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली.भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींना बनावट नोटांसह ताब्यातघेतले. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा असे तीन हजार रुपये जप्त केले. बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट शहरात कार्यरत असावे, असा पोलिसांचा अंदाज असून, अटक केलेल्या आरोपींकडून चौकशीत आणखी काही आरोपी हाती लागतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी. बी. खारगे अधिक तपास करीत आहेत.