शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी पुनर्वसनात बोगसगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 04:03 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत राबविलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात भ्रष्टाचार, अनागोंदीचा प्रकार नगरसेविका सीमा सावळे यांनी उघडकीस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत राबविलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात भ्रष्टाचार, अनागोंदीचा प्रकार नगरसेविका सीमा सावळे यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी जन्मनोंदणी उपनिबंधक म्हणून ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद तळपाडे, कारकून प्रवीण उघडे यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. केवळ बांधकामातच नव्हे; तर अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी झोपडीधारकांच्या नावाने आपले सगेसोयरे, मित्रमंडळीसाठी घरकुले बळकावली. त्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली. या सर्व बोगसगिरीचा भांडाफोड सावळे यांनी केला. निगडी, ओटास्कीम येथील पुनर्वसन प्रकल्पात १२१ बोगस लाभार्थी आढळल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी करा, अशी मागणीही त्यांनी केली. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे कागदोपत्री पुरावे सादर केले होते. त्यांनी तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. परदेशी यांची बदली होताच त्रिसदस्यीय समितीचे कामकाज थंडावले होते. पाठपुराव्यानंतर समितीचा अहवाल आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे सादर केला. या अहवालात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित केले आहेत. तळपाडे, उघडे यांनी लाभार्थ्यांच्या जन्मदाखल्यांवरील पत्त्यामध्ये परस्पर बदल केला. दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविल्यावर त्यांनी खुलासे सादर केले. तथापि त्यांचे खुलासे असमाधानकारक असल्याचा निष्कर्ष आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी काढला. तसेच त्यांच्यावर जन्म-मृत्यू नोंदणीमधील अनियमिततेबाबत नियमावधीन कारवाई करावी, अशी शिफारस केली. त्यानुसार, डॉ. तळपाडे यांनी केलेला अधिकारांचा दुरुपयोग आणि उघडे यांनी वाईट हेतूने केलेले कृत्य यांची गंभीर दखल घेत दोघांचीही खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. (प्रतिनिधी)झोपडपट्टीविरहित शहर प्रकल्पांतर्गत पिंपरी महापालिकेने १८ हजार ३२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले. त्याअंतर्गत निगडी पेठ क्रमांक २२, अजंठानगर, उद्योगनगर, वेताळनगर, मिलिंदनगर, विठ्ठलनगर या झोपडपट्ट्यांमधील आठ हजार ४५२ झोपडीधारकांचे आणि रस्तारुंदीकरणबाधित, रेल्वे मार्गानजीकच्या पूरबाधितांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. केंद्र सरकारने या प्रकल्पांसाठी १६६ कोटी २६ लाख आणि राज्य सरकारने ९९ कोटी २९ लाखांचे अनुदान दिले. यावर ४९५ कोटी ७७ लाखांचा खर्च झाला आहे. मात्र, हरितपट्टा, पूरनियंत्रण रेषा आणि लष्कराच्या संरक्षित क्षेत्रात (रेड झोन) झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका कचाट्यात सापडली आहे.