शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

By admin | Updated: February 19, 2016 00:22 IST

राज्याचा आरोग्य विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील आरोग्य महाशिबिरात

पिंपरी : राज्याचा आरोग्य विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील आरोग्य महाशिबिरात मोफत उपचार झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसून आले. पिंपरी येथील एच. ए. मैदानावरील मोफत शिबिरासाठी सोळा हजार रुग्णांची नोंदणी झाली आहे. तीन हजार जणांची नेत्रतपासणी आणि चष्म्याचे वाटप करण्यात आले. ६० बालकांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू हे व्यंग असलेल्या चार बालकांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली. संयोजक आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर आहे. त्यात सहभागी होऊन गरीब रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शुक्रवारी शिबिराचा समारोप होणार आहे.’’ या वेळी भाजपा नेते सारंग कामतेकर, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या आरोग्य महाशिबिरात १७ मोठ्या रुग्णालयांनी सहभाग घेतला. या रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत अँजीओग्राफी, मर्यादित अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे वाटप, चष्मे व श्रवणयंत्रांचे वाटप, हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया, दंतरोग, नेत्ररोग, त्वचाविकार, हाडांचे आणि मणक्यांचे आजार, श्रवणदोष, प्लॅस्टिक सर्जरी, आयूष, किडनी व मूत्रमार्गाचे विकार यांविषयी उपचार आणि तपासणी केली.’’ मोफत उपचार झाल्याने रुग्ण आणि नातेवाइकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. (प्रतिनिधी)