शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बौर खिंड बनली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:07 IST

शहराच्या जवळील पवनानगर रस्त्यावरील चिखलसे गाव हद्दीतील बौर खिंड प्रवासासाठी धोकादायक झाली आहे. येथे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कामशेत : शहराच्या जवळील पवनानगर रस्त्यावरील चिखलसे गाव हद्दीतील बौर खिंड प्रवासासाठी धोकादायक झाली आहे. येथे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कामशेत शहरापासून तीन ते चार किलोमीटरवर असणाºया बौर खिंडीच्या वरच्या बाजूला असणारी अनेक मोठ्या झाडांची मुळे उघडी पडली असून सोमवारी रात्रीच्या सुमारास यातील एक झाड उन्मळून वरतीच लटकले. तसेच इतर झाडांची अशीच अवस्था असून, ती झाडे कोणत्याही क्षणी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या झाडांमुळे दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.पवनानगरकडे जाणाºया रस्त्यावर बौर खिंड असून, त्या खिंडीच्या काही अंतरावर श्री केदारनाथ महादेवाचे मंदिर आहे. या रस्त्याने पवनानगर भागात अनेक गावे असून या गावांमधील दुग्ध व्यावसायिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी व इतर नागरिक नेहमीच प्रवास करीत असतात. शिवाय श्रावण महिना असल्याने महादेव मंदिरातही दर्शनासाठी अनेक भाविक या रस्त्याने ये-जा करीत असतात. तसेच पवन मावळात वर्षाविहारासाठी जाणाºया पर्यटकांना कामशेतमधून हाच मार्ग आहे.बौर खिंड ही दोन वाहने जाण्या इतपत मोठी असून या पोखरलेल्या खिंडीत वरच्या भागात अनेक झाडे आहेत. पावसामुळे या खिंडीत दरडीवरील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने या झाडांची मुळे सताड उघडी पडली असून झाडांना आधार राहिला नसल्याने अनेक झाडे रस्त्याच्या दिशेला वाकली आहेत. त्यामुळे सोसाट्याच्या वाºयात झाडे पडून झाडांबरोबर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरून जाणाºया वाहनांवर ही झाडे व दरड कोसळली तर मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व प्रवासी यांच्या कडून वर्तवली जात आहे.