शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निविदा मागे घेणारे काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:06 IST

स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास आयत्या वेळी मान्यता देण्यात आली.

पिंपरी : महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत सहभागी होऊन ऐनवेळी माघार घेणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, असा निर्णय स्थायी समितीच्या बैेठकीत घेण्यात आला. साप्ताहिक बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास आयत्या वेळी मान्यता देण्यात आली.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध विकासकामांसाठी निविदाप्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजित विकासकामांच्या निविदा काढल्या जातात. या निविदा भरताना ठेकेदाराला कोणते काम किती रुपयांमध्ये, तसेच किती कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे, याची माहिती अटी व शर्तींच्या समावेशासह असते.स्थायी समितीने ठेकेदारांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या विकासकामांची अथवा खरेदीची निविदाप्रक्रिया पार पाडताना पहिले पाकीट फोडल्यानंतर आपण निविदेत भरलेला दर चुकीचा असल्याचे कारण देत अनेक ठेकेदार निविदा मागे घेतात. त्यामुळे या प्रक्रियेत निकोप स्पर्धा होत नसून, ठेकेदार रिंग करीत असल्याचे उघड झाले आहे. या विषयी स्थायीच्या बैठकीत चर्चा झाली.निविदाप्रक्रियेत सहभागी ठेकेदाराला विकासकामाची, रकमेची संपूर्ण माहिती असते. तरीदेखील या ठेकेदारांकडून केवळ अन्य ठेकेदाराला पूरक परिस्थिती निर्माण करून देण्यासाठी असा प्रकार केला जातो. त्यामुळे निविदाप्रक्रियेमध्ये सहभागी होऊनदेखील पहिले पाकीट फोडल्यानंतर, चुकीचे दर भरल्याचे कारण सांगत निविदा प्रक्रियेतून माघार घेणाºया ठेकेदारांना काळ्या यादीत समावेश केला जाणार आहे. तसेच, पहिले पाकीट उघडल्यानंतर माघार घेणाºया ठेकेदाराचे दुसरे पाकीटदेखील उघडले जात नाही. असे न करता, या ठेकेदाराचे दुसरे पाकीटदेखील उघडण्यात येणार आहे, असे विलास मडेगिरी यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड