शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अर्थसंकल्पावर भाजपाची छाप : महापालिकेचा ४८०५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By admin | Updated: April 18, 2017 15:58 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीला सादर केला.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 18 - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीला सादर केला. मूळ ३०४८ कोटी तर जेएनएनयूआरएमसह ४८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असून भारतीय जनता पक्षाची छाप या अर्थसंकल्पावर आहे. कोणतीही करवाढ  उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालून १ कोटी ९९ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. त्यात जुण्याच योजना मागील पानावरून पुढील पानावर घेतल्या असून मिळकत आणि पाणी करवाढ केली नसून रखडलेल्या विकासकामांना गती, आरक्षणांचा विकास आणि कल्याणकारी योजनांबरोबरच स्मार्ट सिटी, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजना या केंद्राच्या योजनांसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. 
 
महापालिका भवनातील तिसºया मजल्यावरील स्थायी समिती सभागृहात सभापती सीमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा ३५ वा अर्थसंकल्प आहे. सुमारे अर्ध्यातासांच्या  भाषणात आयुक्त वाघमारे यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. अर्थसंकल्पाच्या अभ्यासासाठी मंगळवारी  सकाळी अकरा वाजेपर्यंत स्थायी समिती सभा तहकूब केल्याचे सावळे यांनी जाहीर केले.
 
पायाभूत सुविधांचा विकास 
पायाभूत सुविधांचा विकास, चोवीस तास आणि समान पाणीपुरवठा ; तसेच सक्षम वाहतूक सेवा या तीन महत्त्वाच्या नागरी सुविधांना महापालिकेच्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी ठेवले असून जुन्याच योजनांना मुलामा देऊन नव्याने समावेश करण्यात आला आहे. वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार असल्याने संभाव्य धोके विचारात घेत आयुक्तांनी वास्तववादी अर्थसंकल्प करण्याचा प्रयत्न केला आहे.      
 
आर्थिक वर्षाच्या ३०४८ कोटींच्या मूळ अर्थसंकल्पात १ कोटी ९९ लाख रुपये शिल्लक दाखविली सअून एलबीटीतून  १५०५ कोटी, मालमत्ताकरातून ४५५ कोटी, बांधकाम विकास शुल्कातून २८० कोटी, पाणीपट्टीतून ६५ कोटी, शासकीय अनुदान १९ कोटी, गुंतवणुकीवरील व्याज आणि इतर १३२ कोटी, इतर जमा ८७ कोटी आणि भांडवली जमेच्या माध्यमातून ५३ कोटी, असे ३०४८ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तर १५०० कोटी रुपयांचा महसुली खर्च आणि १०३० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षीत आहे. खर्च विभागात जेएनएनयूआरएम मधील कामांसाठी महापालिकेच्या हिस्स्यापोटी ९८८ कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याशिवाय पाणीपुरवठा विभागासाठी २०२ कोटी, वैद्यकीय विभागासाठी २०३ कोटी, आरोग्यासाठी १४८ कोटी, प्राथमिक आणि दुय्यम शिक्षणासाठी १२७ कोटी, सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्यसाठी १९२ कोटी रुपये अशा प्रमुख तरतुदी आहेत. 
 
स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी
स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी ५० कोटी रुपयांहून अधिक तर पीएमपीएमएलसाठी १५५ कोटी रुपयांची तरतूद आयुक्तांनी केली आहे. स्थानिक संस्था कर, मालमत्ताकर, बांधकाम, अतिक्रमण, आकाशचिन्ह, रस्ते खोदाईतून गेल्या वषीर्पेक्षा अधिक उत्पन्न गृहित धरून अर्थसंकल्पाचा आकार सुमारे ५०० कोटी रुपयांनी वाढला आहे. येत्या वर्षात ७५ किलोमीटरचे चांगल्या दर्जाचे पदपथ उभारण्यासाठी तरतूद केली आहे.  
 
नवे प्रकल्प नाहीत
शहराच्या समतोल विकासासाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे. सुरू असलेले पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाण पूल पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला असल्यामुळे कोणतेही नवे प्रकल्प आयुक्तांनी सुचविलेले नाहीत. स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंशत: बंद झाल्यावर विपरित परिणाम होईल, बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याचा परिणाम जाणवेल असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात त्याचे पडसाद अर्थसंकल्पात उमटलेले नाहीत.
 
१) प्रकल्प जुनेच, नव्याने मांडणी 
२) रखडलेल्या, विकास कामांना गती  
३) आरक्षण विकसित करण्यास प्राधान्य
४) कल्याणकारी योजनांसाठी भरीव तरतूद
५) पायाभूत सुविधांचा विकास
६) चोवीस तास आणि समान पाणीपुरवठा