शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समित्यांवर भाजपाचे वर्चस्व?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:03 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा प्रभागांमध्ये क्रांतिदिनापासून दोन क्षेत्रीय कार्यालयांची भर पडणार आहे. एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये असणार असून ही रचना करताना भाजपाने आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहील आणि...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा प्रभागांमध्ये क्रांतिदिनापासून दोन क्षेत्रीय कार्यालयांची भर पडणार आहे. एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये असणार असून ही रचना करताना भाजपाने आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहील आणि प्रभाग अध्यक्ष भाजपाचाच होईल या दृष्टीने दक्षता घेतली आहे. येत्या बुधवारी (दि. ९) होणाºया आठही प्रभाग समिती अध्यक्षपदी सत्ताधाºयांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात यापूर्वी सहा क्षेत्रीय कार्यालय होते. लोकसंख्या वाढ आणि नवीन प्रभागरचना झाल्यानंतर दोन क्षेत्रीय कार्यालये वाढवण्यासाठी सत्ताधाºयांनी जोर लावला होता. त्यानुसार दोन क्षेत्रीय कार्यालयांची रचना करण्यात आली आहेत. येत्या क्रांतिदिनापासूनच दोन कार्यालये सुरू होणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना भाजपाने धूर्तपणाचे दर्शन घडविले आहे. महापालिके पाठोपाठ सर्व प्रभाग कार्यालये स्वत:कडे राहावीत, या दृष्टीने व्यूहरचना केल्याचे दिसून येत आहे.अ प्रभागात भाजपाचे नऊ नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. ‘ब’ प्रभागात भाजपाचे आठ, राष्ट्रवादीचे सहा आणि शिवसेना एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. ‘क’ प्रभागात भाजपाचे अकरा, राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक आहेत. ‘ड’ प्रभागात भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. ‘फ’ प्रभागात भाजपाचे आठ, राष्ट्रवादीचे सहा आणि मनसे एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. ‘ग’ प्रभागात भाजपाचे नऊ, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना दोन आणि अपक्ष दोन नगरसेवक आहेत. ‘ह’ प्रभागात भाजपाचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा व अपक्ष एक नगरसेवक आहे.‘त्या’ ठिकाणी अपक्षांची मदतआठही ही प्रभागांमध्ये भाजपाचे बहुमत असणार आहे. तसेच ज्या ठिकाणी संख्यात्मकदृष्ट्या संख्या कमी आहे तिथे अपक्षांचीही मदत घेतली आहे. त्यामुळे आठही समित्यांवर भाजपाचे अध्यक्ष निवडून येऊ शकतात. दरम्यान, स्थायी समिती, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा समितीवर वर्णी न लागलेल्या नगरसेवकांनी प्रभाग अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे नगरसेवक प्रभाग समितीचे अध्यक्ष पद मिळविण्यासाठी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे या नेत्यांकडे मागणी करीत आहेत. कोणतेही पद न मिळालेल्या नगरसेवकांना प्रभागाध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.