शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम :लोकमान्य, लोकशाहिरांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:02 IST

लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पिंपरी : लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाषणे, गीत आणि पोवाड्यांमधून त्यांच्या जीवनकार्यांचे स्मरण करण्यात आले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संचालित प्राथमिक विद्यालय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संचालित प्राथमिक विद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती वलोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित झाला. विद्यालयातील नवीन विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना चॉकलेट व फूल देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थापक दिलीप निंबारकर, अध्यक्षा जयश्री निंबारकर उपस्थित होते.जयवंत प्राथमिक शाळाजयवंत महिला शिक्षण आणि उद्योग सोसायटी संचालित जयवंत प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी प्रतिमांचे पूजन केले. रुपेश घोलप हा लोकमान्य टिळक व विनय गायकवाड हा विद्यार्थी अण्णा भाऊ साठे यांच्या भूमिकेत आला होता. पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. काहींनी टिळक व अण्णा भाऊ यांच्या जीवनचरित्रावर भाषण केले. वंदना सावंत यांनी टिळकांची गोष्ट आणि लोकशाहिरांचे साहित्य सांगितले. प्रगती कुंभार व महिमा विटे यांनी निवेदन केले. शर्वरी आठल्ये यांनी संयोजन केले.अनुसाई ओव्हाळ विद्यालयपुनवळे येथील अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आठवी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. नगरसेविका रेखा दर्शले, नितीन दर्शले, संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद ओव्हाळ, विश्वास ओव्हाळ, मुख्याध्यापक जी. एस. गवळी, डी. एम. नेवाळे, व्ही. के. भिंताडे, वाय. ए. ढावरे, डी.जे. खैरनार, व्ही.एस.गायधने, आर.के. भालेराव आदी उपस्थित होते.ज्ञानप्रभात विद्यामंदिरसहयोगनगर येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिरात जयंती व पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम झाला. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर भाषणे व गीते सादर केली. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गवळी, संचालिका सुमन गवळी, मुख्याध्यापक राहुल गवळी, मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे, संजय सोंडेकर, राम जगदाळे, प्रवीण घोरपडे, हेमांगी थानावाला, अंकिता गायकवाड, विजया राजगोपाल, प्रमोद गायकवाड, शिवदास तागतोडे आदी उपस्थित होते.