शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिऱ्हाड पाठीवर घेऊन कारभारी महापालिकेत

By admin | Updated: November 26, 2015 00:49 IST

महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली, तसे अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून

पिंपरी : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली, तसे अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून, आतापासूनच महापालिका भवनात घिरट्या मारू लागले आहेत. काहीजण तर कुटुंबातील सदस्यांनाही महापालिकेची वारी घडवू लागले आहेत. केवळ महापालिका असे ऐकत आलो आहे. मात्र, नेमकी महापालिकेची इमारत कशी आहे, महापौर, आयुक्त यांचे कार्यालय कोठे आहेत, विषय समित्यांची कार्यालये कोठे आहेत, यासह महासभेचे कामकाज कसे चालते याबाबत अनेकांना उत्सुकता असते. निवडणूक लढायची म्हटल्यास या गोष्टींची माहिती असायला हवी. यामुळे अनेकजण उत्सुकतेपोटी महापालिका पाहायला येत आहेत. यामध्ये विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अद्याप प्रभाग, की वॉर्ड निश्चित व्हायचे आहे. आरक्षण काय असेल याचा अंदाज नाही. असे असताना पत्नीसह मुलाला घेऊन काहीजण महापालिकेत तासन् तास घालवितात. महिलांसाठी आरक्षित वॉर्ड झाला, तर पत्नी, नाही झाला तर मुलगा अथवा स्वत: असे नियोजन केलेले महाशय बिऱ्हाडासह महापालिकेत पडीक असतात. काळेवाडी परिसरातील एक महिला नगरसेवक पती आणि मुलासह पालिकेत असतात. पती माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ज्याला संधी मिळेल त्याला निवडणूक लढविता आली पाहिजे या उद्देशाने संपूर्ण कुटुंबच पालिकेत घिरट्या मारीत आहे. विद्यमान शिक्षण मंडळ सदस्यांनाही नगरसेवकपदाचे वेध लागले आहेत. शिक्षण मंडळापुरते मर्यादित असलेल्या या सदस्यांचा महासभेशी संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना येथील कामकाजाबाबत उत्कंठा आहे. शिक्षण मंडळाचे सदस्यपद आहे, नगरसेवक होऊ शकतो, असे त्यांना वाटू लागले आहे. शिक्षण मंडळाच्या कामकाजात तत्परता न दाखविणारे सदस्यही महापालिका कामकाजाची माहिती घेताना दिसतात. शुक्रवारी झालेल्या सभेला एक विद्यमान शिक्षण मंडळ सदस्य पत्रकार कक्षात येऊन बसले होते. ‘महासभेबाबत आपल्यालाही थोडे माहिती असावे, त्यामुळे आलोय’ असे म्हणत बसून होते.(प्रतिनिधी)