शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’ अध्यक्षपद मिळणार भोसरीला?

By admin | Updated: March 23, 2017 04:29 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. स्थायी समितीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा भोसरीला झुकते माप दिले जाणार असून, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आहे. त्यामुळे सर्वच विषय समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व राहणार आहे. महापौर व उपमहापौरपदाची निवड झाल्यानंतर विषय समिती सदस्य आणि अध्यक्ष यांची तातडीने निवड होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे पहिल्या सभेत निवड झाली नाही. सदस्यनिवडीसंदर्भात भाजपाच्या नगरसेवकांची आज सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीची वेळ दुपारी दोनची होती. सुरुवातीला भोसरी विधानसभेतील सदस्यांची दांडी होती. सोशल मीडियावर याची चर्चा झाल्यानंतर दुपारी महापौर पक्षनेत्यांच्या दालनात आले. त्यानंतर भोसरीतील काही नगरसेवक आले. स्थायी समितीत आपली वर्णी लागावी, यासाठी नगरसेवक तीव्र इच्छुक असतात. स्थायी समितीत संधी नाही मिळाली, तर इतर समितीच्या सभापतिपदी वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी पवार म्हणाले, ‘‘समिती सदस्य निवडताना संपूर्ण शहराचा विचार करून आणि नेत्यांचे एकमत होऊन सदस्य नियुक्ती होणार आहे.’’(प्रतिनिधी)