शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत नालेसफाई नावालाच

By admin | Updated: May 24, 2017 04:08 IST

शहरातील मॉन्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. नालेसफाईची सुरू असलेली कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : शहरातील मॉन्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. नालेसफाईची सुरू असलेली कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत, तर काही भागांत नालेसफाईच्या कामाला अद्याप सुरुवातच न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘ई’ प्रभागात कामाची निविदा मंजूर होऊन महिना उलटून गेला, तरीही अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील लोकवस्ती, तसेच औद्योगिक परिसराला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुदतीच्या आत सर्व विभागातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत. त्यानुसार अनेक भागांतील कामे पूर्णत्वास आली आहेत, तर काही भागांत अद्याप नाल्यातील गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असले, तरी ई प्रभागातील बहुतांश भागात नालेसफाईच्या कामांना अद्याप सुरुवातच झालेली नाही. या परिसरात बहुतांश झोपडपट्ट्या आहेत. तसेच औद्योगिक परिसर असल्याने येथील गटारे व नाले १२ महिने तुंबलेले असतात. येथील रहिवासी दैनंदिन कचरा नाले व गटारात टाकत असल्याने नालेसफाईच्या कामात अडथळे निर्माण होतात. परिणामी ही कामे करायला कोणीही कंत्राटदार पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे. असे असले, तरी या परिस्थितीचा फटका या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना बसत आहे. मॉन्सूनपूर्व कामे न झाल्याने या विभागातील बहुतांश नाले व गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत. त्यातून कमालीची दुर्गंधी येत आहे. पावसाळ्यात हीच परिस्थिती राहिल्यास नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.