शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यात भातलागवडी जोमात

By admin | Updated: July 2, 2017 02:26 IST

मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या पावसाचा जोर असल्याने लावणीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी येथील शेतकरी प्लॅस्टिक कागद, पोते, इरले-घोंगड्याचा वापर करून भात लावणीची कामे करताना दिसत आहेत.मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक शेतकरी घेतात. या भागातील शेतकरी दरवर्षी नदीच्या पाण्यावर रोपवाटिका तयार करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने रोपे लागवडीसाठी शेतात पाणी  आल्याने लागवड सुरू करण्यात आली.वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मुळशी तालुक्यात भातलागवडीसाठी मजूरच मिळत नाहीत. काही गावांमध्ये एकमेकांमध्ये अदलाबदली करून भातलागवड सुरू केली आहे. काही परराज्यांतील बांधकाम मजुरांना शेतीकामासाठी न्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.अधिक उत्पन्न वाढीसाठी व मशागतीसाठी चारसूत्री पद्धत अत्यंत योग्य असल्याने, रोग व किड्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते. त्याचबरोबर सर्व रोपांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहत असल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. शेतकरी सध्या पारंपरिक पद्धत सोडून चारसूत्री भातलागवडीकडे वळलेला दिसत आहे.वारंवार कृषी अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. तसेच शेतकरी एकमेकांना मदत करत असल्याने भात रोपांची लागवड केली जात आहे. तसेच आधुनिक चारसुत्री पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.संततधार पावसाने भातरोपे जोमातवडगाव मावळ : या नक्षत्रात निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने दडी मारल्याने भातपिकाच्या दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यावर ओढवले असते. ठिकठिकाणी भाताची रोपे उगवली होती. ती पावसाअभावी पिवळी पडत चालली होती. तरी, बळीराजाला वरुणराजने चांगली साथ दिली; त्यामुळे भातरोपे जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातरोपे मोठ्या डौलात वाढत आहेत.