शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा बेततोय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:11 IST

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे

पिंपरी : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे. पुणे, तसेच लोणावळा या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत घडणाऱ्या अपघाताच्या घटनांच्या तुलनेत देहूरोड ते खडकी या वर्दळ नसलेल्या ठिकाणी अपघातांची अधिक नोंद आहे. या अपघातांना नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.पुणे ते लोणावळा लोहमार्गावर देहूरोड ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान महिन्याकाठी किमान दोन ते तीन जण रेल्वे अपघाताचे बळी ठरत आहेत. वास्तविक, या मार्गावर लोकलच्या फेºया कमी आहेत. एक्सप्रेससुद्धा विशिष्ट वेळेत आहेत. मुंबई, पुण्याप्रमाणे येथे रेल्वे मिनिटा-मिनिटाला धावत नाही. तरी वर्षभरात घडलेल्या घटनांची संख्या २५ हून अधिक आहे. देहूरोडमध्ये ३, आकुर्डीत ४, पिंपरीत ६, कासारवाडीत ५, दापोडीत ४, खडकीत ३ अशा अपघातांच्या घटनांची नोंद आहे. याशिवाय रेल्वे अपघातात जखमी होण्याच्या, कायमचे जायबंदी होण्याच्याही घटना शहरात घडल्या आहेत.कानाला हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणाºया तरुणांना रेल्वेच्या धडकेने जीव गमावावा लागल्याच्या घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणाºयांना पिंपरी आणि कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत प्राणास मुकावे लागले आहे. रेल्वे प्रवासात हुल्लडबाजीकरणाºया दरवाजात थांबून अथवा दरवाजात पाय बाहेर सोडून बसणारे तरुण खांबाचा धक्का लागून पडले आहेत. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची रेल्वे पोलिसांकडे नोंद आहे. देहूरोड, पिंपरी, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी या रेल्वे स्थानकांवर हमखास अपघात घडून येत आहेत.प्रवासावेळी दक्षता बाळगावीपुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास करताना ३१ वर्षांची महिला गर्दीमुळे पाय घसरून पडली. त्याच वेळी प्रसंगावधान दाखवून पी़ टी़ कर्दाळे आणि अनिल बागुल या रेल्वे पोलिसांनी तिला वाचविले. मोठ्या दुर्घटनेतून ही महिला बचावली. प्रवास करताना नागरिक सुरक्षिततेची दक्षता घेत नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडतात, असे त्यांचे मत आहे.रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन मुलांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. १२ नोव्हेंबर २०१७ ला पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडलेली घटना अद्यापही नागरिकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. लोणावळा-पुणे लोकलमधून पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मुलांना घेऊन रुळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणाºया कोयना एक्सप्रेसची धडक महिलेसह मुलांना बसली. तिघांचा जागीच मृत्यू झाला. २५ वर्षे वयाची महिला, सात वर्षांचा मुलगा, १० वर्षांची मुलगी आहे. असे तीनजण रेल्वे अपघातात दगावले. या घटनेनंतर नागरिक दक्षतेचा धडा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र मातेसह दोन मुले दगावण्याची हृदयद्रावक घटना घडल्यानंतरही जोखीम पत्करून धोकादायकरीत्या रूळ ओलांडणाºयांची संख्या घटलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले पादचारी पूल ओस पडल्याचे दिसून येतात. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी येथे पुलाचा वापर करण्याऐवजी उडी मारून शॉर्टकट मार्गाने रुळ ओलांडताना प्रवासी दिसून येतात. रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे रुळ ओलांडू नये,पादचारी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या जात असताना, त्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी धोकादायकरीत्या रुळ ओलांडताना दिसतात.