शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अपंगांना दोन हजार पेन्शन, महापालिका सभेत मान्यता, उद्योगनगरीतील अंध, दिव्यांगानाही मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:15 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अंध- अपंगांसाठी दरमहा दोन हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्याचा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अंध- अपंगांसाठी दरमहा दोन हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्याचा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर केला. सर्व दिव्यांगांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सत्ताधारी पक्षाने दिलेली दीड हजार ऐवजी दोन हजार आणि वयाची अट नसावी, ही उपसूचना मंजूर केली. मात्र, विरोधीपक्षाची उत्पन्न अट, वय नसावे, अंधाचाही समावेश करावा, उपसूचना नाकारली.महापालिकेच्या वतीने अपंग कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विविध योजना राबविणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेने आत्ता अंध-अपंगांना पेन्शन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक नगरीतील अंध-अपंगांसाठी तशी योजना राबविण्यात येणार असून, अपंगांसाठी राखून ठेवलेल्या ३ टक्के अपंग कल्याण निधीच्या विनियोगाचा हिशेब व भविष्यातील खर्चाचे नियोजन अपंग कल्याण आयुक्तालयाला सादर करावे, अशा सूचना राज्यातील सर्व महापालिकांना देण्यात आल्या आहेत.खर्चाचे नियोजन महापालिकांनी स्वत:हून न केल्यास निधीच्या विनियोगासाठी भाग पाडण्यात येईल, असा इशारा अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी दिला. त्यानुसार सर्वच महापालिकांचे या निधीचा विनियोग करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपंगांसाठी पेन्शन योजना सुरू करणे याचा देखील त्यामध्ये उल्लेख आहे. अपंगांसाठी सामाजिक कार्य करणाºया अनेक स्वयंसेवी संस्थांकडून ही योजना सुरू करण्याची मागणी वारंवार होत आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी बैठक घेतली होती.विरोधकांची उपसूचना फेटाळली१मंगला कदम म्हणाल्या, ‘‘अंध, अपंगांना मदत करण्याचे धोरण चांगले आहे. मात्र, इतर कल्याणकारी योजनांसाठी असणाºया जाचक अटी नसाव्यात. रेशनिंग कार्ड अशा जाचक अटी कमी करण्याची गरज आहे. तसेच वयाची अट ही १८ नसावी. जन्मत: पहिल्या वर्षांपासून मदत द्यावी. ४० टक्के अपंग ही अट रद्द करावी.’’ जावेद शेख म्हणाले, ‘‘केशरी शिधा पत्रिका ही अट असू नये. त्यात अंध बांधवांचाही विचार करावा.’’ सचिन चिखले आणि उत्तम केंदळे यांनीही भूमिका मांडली.२ सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अपंग-अंधांसाठीच्या योजनेच्या प्रस्तावास उपसूचना आहे. यापूर्वी अपंगांसाठी असणारा निधी खर्चला गेला नाही. यावरून यापूर्वीच्या सत्ताधाºयांना कितपत गांभीर्य होते, हे लक्षात येईल. मंजूर निधी आम्ही खर्च करीत आहोत. अधिक लाभार्थींना फायदा व्हावा, असे आमचे धोरण आहे. पाच वर्षांवरील अपंगांना मदत देण्यात यावी. तसेच दीड हजारांऐवजी दोन हजार पेन्शन असावी. या योजनेस पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना असे नाव देण्यात यावे.’’ त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी विरोधी पक्षाची उपसूचना न स्वीकारता पवार यांनी मांडलेली उपसूचनेसह मंजुरी दिली.तीन कोटींचा खर्चअपंगांच्या योजनेसाठी येणाºया खर्चाविषयी विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘यासंदर्भात नियमावली काय असणार आहे. त्याचा महापालिकेवर किती बोजा पडणार आहे. याची माहिती प्रशासनाने द्यावी. वयाची अट नसावी. तिला पेन्शन हे नाव नसावे. चाळीस टक्के अपंग ही अट नसावी. परदेशात एखादे बाळ जन्माला आले तर तेथील सरकार आर्थिक मदत करते. ज्या कुटुंबात अपंग बाळ जन्माला आले. त्यांना आर्थिक त्रास होतो. आपण मदत करायलाच हवी. तसेच रक्कमही वाढवावी, ही उपसूचना घ्यावी.’’ त्यावर खुलासा करताना डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘शहरात नोंदणीकृत १८०४ अपंग आहेत. त्यांच्यासाठी तीन कोटी रुपये खर्च होणार आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड