शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उपोषण मागे, पीपी अ‍ॅक्टनुसार कारवाईला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:55 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाकडून पीपी (पब्लिक प्रीमायसेस) अ‍ॅक्टनुसार नागरिकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात येणाऱ्या नोटिसा व घेण्यात येत असलेल्या सुनावणीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.

किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाकडून पीपी (पब्लिक प्रीमायसेस) अ‍ॅक्टनुसार नागरिकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात येणाऱ्या नोटिसा व घेण्यात येत असलेल्या सुनावणीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. तसेच अतिक्रमितांची नावे मतदारयादीमध्ये समावेश करण्यासह देहूरोड बचाव संघर्ष समितीने आंदोलनादरम्यान उपस्थित केलेले मुद्दे याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी कारवाई थांबविण्याबाबत चर्चा करून थांबविल्याने आमरण उपोषण अखेर तिसºयादिवशी मागे घेतले आहे.कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने देहूरोड बाजारपेठ, गांधीनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, पंडित चाळ, इंदिरानगर, नायडूनगर, लक्ष्मीनगर, पारशी चाळ, राजीव गांधीनगर, शितळानगर येथील संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाºया नागरिकांना पीपी अ‍ॅक्टनुसार एक नोव्हेंबरपासून सुमारे तीनशेहून अधिक नोटीस दिल्या असून, सुनावणी घेण्यात येत असून, कायद्यात सुधारणा करण्याची गरज संघर्ष समितीने मागणी करीत भाजपाचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सूर्यकांत सुर्वे, आरपीआयचे (आठवले गट) अमित छाजेड व परशुराम (जक्कल) तेलुगू यांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलनास संबंधित भागातील नागरिक, तसेच माजी नगरसेवक मारुती कांबळे, मानव कांबळे, संदेश भेगडे यांच्यासह विविध पक्ष व संघटना यांनी पाठिंबा दिला होता. आंदोलनादरम्यान देहूरोड बचाव संघर्ष समितीमार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डाने चुकीच्या पद्धतीने नोटीस बजावून सुनावणी घेत असल्याचे विविध मुद्दे निदर्शनास आणून दिले होते.सूर्यकांत सुर्वे, अमित छाजेड व परशुराम (जक्कल) तेलुगू यांनी सुरू केलेले उपोषण सोडल्याचे सुर्वे यांनी जाहीर केले. या वेळी कॅन्टोन्मेन्टचे सीईओ अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळ तंतरपाळे, माजी उपाध्यक्षा सुनंदा आवळे, धर्मपाल तंतरपाळे, मेहरबान सिंग, यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.>सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१६ महिन्यात पंचमढी (मध्यप्रदेश) कॅन्टोन्मेंट संबंधित एका खटल्यासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीतील रक्षा महानिर्देशकांच्या ३ फेब्रुवारी २०१७च्या एका पत्रानुसार, तसेच प्रधान संचालक दक्षिण विभाग पुणे यांच्या एक मार्च २०१७ पत्रानुसार कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाºया नागरिकांची नावे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदारयादीत समावेश करण्यास मनाई केली होती. अतिक्रमितांची मतदारयादीत नावे समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत केंद्र सरकारमार्फत संबंधित न्यायपालिकेत बाजू मांडण्यासाठी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे मागणी केली असून, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे बारणे यांनी आंदोलकांना सांगितले.