शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पवनेतील गाळ काढण्यास अखेर सुरुवात

By admin | Updated: May 10, 2016 00:39 IST

दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि वाढते तापमान, त्याचबरोबर गेल्या वर्षी तुलनेने कमी झालेला पाऊस यामुळे पवना धरणातील पाण्याचा साठा प्रथमच कमी झाला आहे.

पवनानगर : दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि वाढते तापमान, त्याचबरोबर गेल्या वर्षी तुलनेने कमी झालेला पाऊस यामुळे पवना धरणातील पाण्याचा साठा प्रथमच कमी झाला आहे. भविष्यात तो आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीला या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. अनेक वर्षांपासून धरणातील गाळ काढला नसल्याने सध्या धरणातील पाणीसाठ्याची क्षमता कमी होत चालली आहे. हा गाळ काढण्यास सोमवारी सुरुवात झाली. गेल्या ४५ वर्षांत पवना धरणातील पाणीसाठा प्रथमच घटला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे दिले होते. त्याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांची दखल घेत जिल्हाधिकारी, तसेच पाटबंधारे, पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी धरणात जाऊन पाहणी केली. पवना धरण परिसरात गाळ काढण्यास सोमवारी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तसेच महसूल विभागाचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.गाळ काढण्यासाठी बारणे यांनी त्यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये निधी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. गाळ काढण्याची मोठी जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आहे. या संदर्भात आयुक्त दिनेश वाघमारे यांना माहिती देण्यात आली आहे. यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी केली.पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हा एकमेव स्रोत आहे. गेल्या ५० वर्षांत पवना धरणातील गाळ काढला नाही. साचलेला गाळ काढण्याची जबाबदारी संपूर्णपणे राज्य शासन व महापालिकेची आहे. सध्या पावसाळा सुरू होण्यास काही अवधी असल्याकारणाने आतापासून सुरुवात केल्यास पाण्याचा साठा काही प्रमाणात पुढील वर्षासाठी वाढेल. परंतु धरण भागातील पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर प्रत्येक वर्षी गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू ठेवल्यास पवना धरणातील पाण्याचा साठा कायमस्वरूपी वाढेल व जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होईल. गाळ काढण्याच्या या प्रक्रियेमध्ये सामाजिक संस्था, स्थानिकबांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांनी सहभागी होऊन स्थानिक शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री पुरविल्यास कमी वेळेत मोठ्या क्षमतेने पवना धरण पात्रातील गाळ काढला जाऊ शकतो.(वार्ताहर)