शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

भावी आमदारांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 06:53 IST

विधानसभा निवडणूक : राजकीय पक्षाऐवजी वैैयक्तिक प्रचार करण्यावर भर

हणमंत पाटील ।पिंपरी : आगामी लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची चर्चा आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, मावळ व भोसरी मतदारसंघांतील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मतदारसंघातील विविध कार्यक्रमांत ‘भावी आमदार’ असा आवर्जुन उल्लेख करण्याचा आग्रह धरला जात आहे. तसेच शहरातील जाहिरातफलक, चारचाकी वाहने, रिक्षा यांच्यावर भावी आमदारांचा फोटो ठळक उल्लेखासह झळकत आहे.शहरातील राजकारणात सुरुवातीपासून गावकी-भावकीचा प्रभाव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उद्योग-व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरितांचे प्रमाण वाढले आहे. साधारण ५० ते ६० टक्के नागरिक बाहेरगावाहून येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील मतांचे समीकरण बदलू लागले आहे. गेल्या दशक-दोन दशकभरात अनेकांनी शहरात स्थायिक होऊन उद्योग-व्यवसायांत भरारी घेतली आहे. आर्थिक सुबत्ता आणि जनसंपर्क वाढल्याने शिक्षणसम्राट, उद्योजक व व्यावसायिकांची नावे इच्छुक म्हणून पुढे येऊ लागली आहेत.विविध पक्षांच्या नगरसेवकांनाही विधानसभेवर निवडून जाण्याचे वेध लागले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी दोन वर्षांपासून महापालिकेतील लाभाची पदे घेऊन आमदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरूही केली आहे. मतदारसंघातील घरोघरी जाऊन थेट मतदरांशी संवाद, नागरिकांच्या वैैयकितक अडचणींची सोडवणूक करणे, शाळा-कॉलेजच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती, ज्येष्ठ नागरिक व महिला संघटनांच्या कार्यक्रमांना आर्थिक मदत, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर समर्थकांमार्फत संयोजकांकडे भावी आमदार असा आवर्जून उल्लेखाचा आग्रह धरला जात आहे.विशेषत: वाढदिवसानिमित्ताने शहरातील मोक्याच्या ठिकाणी झळकणाºया होर्डिंग व जाहिरातफलकांवर स्वत:च्या फोटोमागे विधानभवनाच्या इमारतीचा फोटो दाखविण्याची तजवीज केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या मोटारींवर भावी आमदार असा उल्लेख व फोटो दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे स्वपक्षीय चिन्ह टाळून वैयक्तिक ब्रँडिंग करताना हे भावी आमदार दिसत आहेत. त्यावरून पक्षाने तिकीट दिले नाही, तरी वेगळ्या तºहेने लढण्याची तयारी असल्याचे कार्यकर्त्यांना ठामपणे सांगत आहेत. काही खासगी संस्थांमार्फत मतदारांचा कल कोणत्या पक्षाला आहे, याचीही चाचपणी इच्छुक करीत आहेत.यात्रा अन् लग्नाला हजेरीसध्या शहर आणि मावळ परिसरातील विविध गावांच्या यात्रा सुरू आहेत. त्या ठिकाणी भावी आमदारांच्या स्वागताचे फलक झळकत आहेत. यात्रेतील कुस्ती, तमाशा व सांस्कृतिक कार्यक्रमांना या इच्छुकांकडून बक्षिसे जाहीर केली जात आहेत. शिवाय लग्नसराईची संधी साधून कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह लग्नाला आवर्जून हजेरी लावत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक