शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!

By admin | Updated: September 29, 2015 02:07 IST

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खडकी, रावेत, नेहरुनगर परिसरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या दणदणाटात रात्री उशिरापर्यंत

पिंपरी : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खडकी, रावेत, नेहरुनगर परिसरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या दणदणाटात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणुका शांततेत पार पडल्या. पुढच्या वर्षी लवकर या... अशी घोषणा देत परिसरातील मंडळांच्या आणि घरगुती गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी विसर्जन घाटावर मोठी गर्दी होती.-------------खडकी : ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, फुलांच्या सजावटीत विराजमान बाप्पापुढे हवेत उंच पताका भगवे ध्वज फडकावत, सर्व परिसर भक्तिमय झाला होता. प्रत्येक मंडळाने वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. त्यात खडकी मार्केट, मधला बाजार, मित्र सागर, बाल मित्र, अमर शिवराज मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक मनाचा ठाव घेणारी ठरली. महादेव मंदिर घाटावर १८५५ घरगुती, ४० मोठ्या व ३० लहान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथांतून ढोल-ताशा, ढोल-लेझीम व पारंपरिक वाद्यांच्या निनादात उत्साहात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. शिवाजी पुतळा येथून दुपारी १२ वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. बोर्डाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.वेगळेपण जपणाऱ्या विठ्ठल मंदिर देवस्थानची मिरवणूक सर्वप्रथम पालखीतून निघाली. महिलांचा ताल धरत रिंगणनृत्य आकर्षणाचा विषय ठरला. गवळीवाडा मित्र मंडळाने यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाला मात व कुटुंबांना साथ या मोहिमेवर मिरवणुकीतील खर्च कमी करून पालखीतून विसर्जन सोहळा पार पाडला. विलास मारटकर यांच्या पुढाकाराने मंडळांनी ही अनोखी मोहीम राबविली गेली. मानाचा पहिला गणपती नूतन तरुण मंडळाने बँड पथक व निर्भीड संघाच्या ढोल पथकाने मुख्य मिरवणूक सुरुवात झाली. मंडळाने यंदा देखावा न करता दुष्काळग्रस्तांना मदतीचा मानस ठेवला आहे. मानाचा दुसरा गणपती मधला बाजार मंडळात अग्रभागी असलेल्या मोरया ढोल पथकाने पुन्हा एकदा खडकीकरांची मने जिंकली. मंडळाने तयार केलेला आकर्षक रथ लक्ष वेधून घेत होता. खडकी मार्केटच्या मिरवणुकीत जय मल्हारवरील जिवंत देखावा व नृत्यकला सादर करणाऱ्या पथकातील युवक व युवती उपस्थितांचे आकर्षण ठरले. (वार्ताहर)------------