शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बालाजीनगरात दारूअड्डे उद्ध्वस्त

By admin | Updated: February 5, 2016 01:48 IST

भोसरी येथील बालाजीनगरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर भोसरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला

पिंपरी : भोसरी येथील बालाजीनगरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर भोसरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला. या छाप्यात पाच ठिकाणचे दारूअड्डे उद्ध्वस्त केले. या अवैध दारू व्यवसायाला विरोध करणाऱ्या महिलाही पोलिसांच्या मोहिमेत सहभागी झाल्या. यामध्ये दारू विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे. येथे सुरू असलेल्या बेकायदा दारूविक्री व्यवसायाविरोधात परिसरातील महिलांचा अनेक दिवसांपासून विरोध होता. लेखी तक्रारी दिल्या होत्या. याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांच्यासह पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा अचानक बालाजीनगरात दाखल झाला. घराघरांची झडती सुरू झाली. कोम्बिंग आॅपरेशनप्रमाणे बालाजीनगरात पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी पाच ठिकाणचे दारू अड्डे उद्ध्वस्त केले. स्थानिक नगरसेविका सीमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील अनेक महिला एकत्रित आल्या होत्या. हे दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी रणरागिणींनी पोलिसांना मदत केली. छुप्या पद्धतीने बेकायदापणे दारू विक्री करणाऱ्यांच्या अड्ड्यावरील दारूसाठा नष्ट करण्यात आला. दारूने भरलेले कॅन नष्ट करण्यात आले. तर अवैध दारू विकणाऱ्या आशा बानू बादेला (वय ५२) आणि सत्त्वशीला काळे (वय ५०) या दोन महिलांना अटक केली. (प्रतिनिधी)