शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बेकरी व्यावसायिक स्वच्छतेबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 02:57 IST

विक्रेत्यांकडून अन्नसुरक्षा मानके धाब्यावर

भोसरी : भोसरी परिसरातील अनेक बेकरी व्यावसायिकांना स्वच्छतेचे वावडे असल्याचे पाहायला मिळत आहे. बेकरीचे उत्पादन घेण्यापासून ते विक्रेत्यापर्यंत माल पोहचविण्यापर्यंत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून, अन्न व औषध प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.शहरात बेकरीचा माल तयार करणाऱ्या असंख्य भट्ट्या आहेत. या भट्ट्यांमध्ये तयार होणारा बेकरीचा माल शहरातील विविध बेकºयांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, येथे तयार होणाºया उत्पादनाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली असते. अन्नपदार्थ उघड्यावर टाकलेले असतात. उत्पादित मालदेखील उघड्यावरच असतो. कायद्यानुसार बेकरीच्या पदार्थांचे उत्पादन केले जात असलेल्या ठिकाणी कामगारांना राहता येत नाही. मात्र, बहुसंख्य कामगार बेकरीमध्येच राहतात. एवढेच नव्हे, तर अनेक बेकºया दाट वस्तीच्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी धुराडे व इतर गोष्टी पाळल्या जात नाहीत.अनेक बेकºयांमध्ये विक्रीसाठी ठेवलेला माल हा अत्यंत निकृष्ट प्रतीच्या पदार्थांपासून बनविलेला असतो. मात्र, ग्राहक त्या बाबतीत अनभिज्ञ असतात. विक्री करण्यात येणाºया अन्नपदार्थांबाबत प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. मात्र, अनेक बेकरी उत्पादक जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाच्या पदार्थांपासून बेकरीचा माल तयार करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. बेकºयांवर अन्नसुरक्षा मानदे कायद्यांतर्गत अन्नसुरक्षेच्या दृष्टीने बेकरी व्यावसायिकांना अनेक नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, ते धाब्यावर बसविले जात आहेत.उत्पादित बेकरी माल अस्वच्छ अशा टेम्पोंमधून पोहचविला जातो. माल उतरविणारे कामगारही मालाशेजारी टेम्पोत बसलेले असतात. माल उतरविताना जागा मिळेल तेथे माल ठेवला जातो. त्यानंतर दुकानात माल पोहचल्यानंतर विक्रेतेदेखील स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेत नाहीत. एलईडी दिव्यांच्या झगमगाटामध्ये वरकरणी दुकाने, बेकºया सजविल्या आहेत. मात्र, आतमध्ये भयानक परिस्थिती आहे. बेकरी उत्पादन बनविण्यापासून ते विक्रीपर्यंतचा प्रवास अस्वच्छतेच्या मार्गाने होत आहे. अन्न व औषध प्रशासन, तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड