शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘फिल्डिंग’ लावूनही बिघडली बदल्यांची गणिते

By admin | Updated: May 6, 2016 05:50 IST

अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत

पिंपरी : अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत बदलीसाठी ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, आयुक्तांची अचानक बदली झाल्याने बदलीसाठी तयारीत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांंचे गणित बिघडले आहे. एप्रिल आणि मे हे महिने म्हणजे बदल्यांचा हंगाम समजला जातो. या महिन्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. मनाप्रमाणे बदली व्हावी, अशी अनेकांची इच्छा असते, तर काहींना बदलीच नको असते. महापालिकेतील अनेक पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक विविध विभागांत नोकरीस आहेत. पदाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून कामाला देखील ‘ठेंगा’ दाखवीत असल्याची उदाहरणे आहेत. तसेच बदल्यांच्या वेळीही अशा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बदल्या होतात. सध्यांच्या बदल्यांच्या हंगामात इच्छित ठिकाणी बदली करवून घेण्यासाठी विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यातच आता महापालिका निवडणुका जवळ आल्याने पदाधिकाऱ्यांनीदेखील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष घातले होते. एखादा अधिकारी, कर्मचाऱ्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, यासाठीही पदाधिकाऱ्यांकडून बदल्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी ‘सेटिंग’ही लावले होते. मात्र, आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाल्याने अनेकांची गणितेच बिघडली आहेत. आयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटेअनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणारयांची संख्याही अधिक आहे. यामुळे कामकाजावर देखील काही प्रमाणात परिणाम होतो. मात्र, संबंधित कर्मचारी एखाद्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बदलीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिल्यानंतर काही तरी फायदा असल्याने त्या ठिकाणाहून बदली नको असते. बदली टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारण्याचे प्रकारही घडतात. कर्मचाऱ्यांची मानसिकता नाहीशासनाच्या इतर संस्थांमध्ये काम करीत असताना एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, तर कधी इतर जिल्ह्यांतही बदली केली जाते. त्यासाठीची तयारीही कर्मचारी ठेवतात. तर महापालिकेत काम करीत असताना बदली करायची असल्यास महापालिका हद्दीअंतर्गतच केली जाते. केवळ एखादा विभाग बदलू शकतो. फार फार तर येण्या-जाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर अंतर वाढू शकते. तरीही बदलीसाठी कर्मचाऱ्यांची मानसिकता नसते. बदली रद्दसाठी हालचाली केल्या जातात.