शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पाालिकेची रोपवाटिका मरणासन्न अवस्थेत

By admin | Updated: April 26, 2017 03:54 IST

महापालिकेच्या दोन मोठ्या रोपवाटिका असूनही गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या उद्यान विभागाने विविध रोपे खरेदी

रावेत : महापालिकेच्या दोन मोठ्या रोपवाटिका असूनही गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या उद्यान विभागाने विविध रोपे खरेदी करण्यासाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. रोपवाटिका असूनही कोट्यवधींची रोपे बाहेरून खरेदी करावी लागत असतील, तर रोपवाटिकांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. शिवाय या रोपवाटिका चालविण्यासाठी तसेच रोपे खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणारे पैैसे म्हणजे सामान्य नागरिकांच्या कराची उधळपट्टीच आहे.या रोपवाटिकांची पाहणी केली असता प्राधिकरणमधील रोपवाटिकेचा परिसर हा मोठा आणि विस्तृत आहे. मात्र, वाटिकेच्या व्यवस्थापन तसेच देखभालीमध्ये सुसूत्रता अजिबात नसल्याचे पाहायला मिळाले. देखभालीअभावी या रोपवाटिकेतील सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रोपे जळून गेली आहेत. या रोपवाटिकेत सुमारे अंदाजे १५ ट्रक माती शेड गोडाऊनमध्ये पडून आहे. या मातीचा उपयोग वापर रोपे बनवण्यासाठी होऊ शकतो.या रोपवाटिकेत हजारो मातीच्या नवीन कुंड्या धूळ खात पडून आहेत. त्यात माती टाकून रोपांची निर्मिती करणे शक्य आहे. मात्र व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे रोपांची निर्मिती करणेच बंद झाले आहे.या रोपवाटिकेच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? तसेच बाहेरून रोपे खरेदीकरिता मुद्दाम या वाटिकेची दुरवस्था केली तर नाही ना, असा सवाल प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीने केला आहे.तसेच वाटिकेच्या या दुरवस्थेची आयुक्तांनी सर्व बाजूंनी चौकशी करावी, दक्षता विभागाने त्वरित दखल घेऊन रोपवाटिकेला भेट द्यावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीने केली आहे.प्राधिकारण नागरी सुरक्षा समितीच्या पर्यावरण तज्ज्ञांनी याबाबत निरीक्षण केले आहे. यामध्ये समितीच्या सुनील चौगुले, विजय मुनोत, आणि समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी रोपवाटिकेची पाहणी केली असता सदरच्या बाबी निदर्शनास आल्या. सदरची रोपवाटिका पुनर्जीवित होऊ शकते असेही नमूद केले. त्यासाठी महापालिकेने त्वरित पावले उचलावीत म्हणजेच जून २०१७ पर्यंत प्राधिकरणातील रोपवाटिका पुन्हा पुनर्जीवित होऊ शकेल. (वार्ताहर)