शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

प्राधिकरण विकासाला खोडा; भाजपानेही गिरवला राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा कित्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:17 IST

- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नसल्याने १५ वर्षांत विकासाला खोडा बसला आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने गिरविलेला कित्ता भारतीय जनता पक्षानेही गिरविला आहे. भाजपा सरकारची सत्ता संपुष्टात यायला वर्ष शिल्लक राहिले असताना अद्यापही समिती झालेली नाही. परिणामी राजकीय अनास्थेने प्राधिकरण विकासाला खोडा बसला ...

- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नसल्याने १५ वर्षांत विकासाला खोडा बसला आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने गिरविलेला कित्ता भारतीय जनता पक्षानेही गिरविला आहे. भाजपा सरकारची सत्ता संपुष्टात यायला वर्ष शिल्लक राहिले असताना अद्यापही समिती झालेली नाही. परिणामी राजकीय अनास्थेने प्राधिकरण विकासाला खोडा बसला आहे.औद्योगिकनगरीतील नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ रोजी करण्यात आली. एकूण १० गावे, ४२ रहिवासी पेठा व चार व्यापारी पेठांचे नियोजन करण्यात आले. एकूण ४३२३ हेक्टर क्षेत्रापैकी १७२३ हेक्टर क्षेत्र नियोजन आणि नियंत्रणाखाली आहे. एकूण संपादनाखाली असलेले क्षेत्र २५८४ हेक्टर आहे. त्यापैकी ताब्यात आलेले क्षेत्र १७७१ हेक्टर आहे. त्यापैकी विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर आहे. आजपर्यंत ३४ गृह योजना राबविण्यात आल्या असून, २३१ व्यापारी वाणिज्य प्रयोजनाचे गाळे आहेत.प्राधिकरणाने ६९७९ निवासी आणि व्यापारी गाळ्याची विक्री केली आहे. तर संपादनाखाली ५६ हेक्टर क्षेत्र येणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत ११ हजार २२१ सदनिकांची निर्मिती केली. स्थापनेपासून आत्तापर्यंतचा कालखंड पाहिल्यास उद्योनगरीतील नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्णकरण्यात प्राधिकरण कमी पडले आहे. हे वास्तव आहे. बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे मूळ उद्देशापासून प्राधिकरण दूर गेले आहे. आजवरच्या एकूण कालखंडापैकी या समितीवर सर्वाधिक कालखंड प्रशासकीय राजवट राहिली आहे. त्यामुळे आजवर दृष्टे अधिकारी न मिळाल्याने विकासाला खोडा बसला आहे.१५ वर्षांपासून प्रशासकीय राजगेल्या पंधरा वर्षांत म्हणजे प्राधिकरणावर २००४ पासून विभागीय आयुक्त दिलीप बंड, डॉ. नितीन करीर, प्रभाकर देशमुख, विकास देशमुख, एस. चोक्कलिंगम् आणि विद्यमान चंद्रकांत दळवी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती. दळवी यांच्याकडील जबाबदारीकाढून घेऊन पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविली होती. मात्र, त्यांनी पदभार न स्वीकारल्याने दळवीच अध्यक्षपदाचे काम पाहत आहेत. अध्यक्ष पूर्णवेळ नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाच प्राधिकरणाचा गाडा हाकावा लागत आहे.लोकनियुक्त समितीच नाहीराष्टÑवादी आणि काँग्रेसची सत्ता असतानाही चौदा वर्ष या संस्थेवर लोकप्रतिनिधी निवडलेले नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात कधीही लक्ष घातले नाही. परिणामी राष्टÑवादीच्या एकाही कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. सत्तांतर झाल्यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी प्राधिकरणाची लोकनियुक्त समिती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारीच अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. आघाडीचा कित्ता भाजपाने गिरविला आहे.- प्राधिकरणाचे एकूण ४३२३ हेक्टर क्षेत्रापैकी १७२३ हेक्टर क्षेत्र नियोजन आणि नियंत्रणाखाली.- संपादनाखाली असलेले क्षेत्र २५८४ हेक्टर, ताब्यात आलेले क्षेत्र १७७१ हेक्टर.- विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर असून आजपर्यंत ३४ गृह योजना, २३१ व्यापारी वाणिज्य प्रयोजनाचे गाळे.- गेल्या ४६ वर्षांत ६९७९ निवासी आणि व्यापारी गाळ्याची विक्री, ११ हजार २२१ सदननिकांची निर्मिती.- संपादनाखाली ५६ हेक्टर क्षेत्र येणे अपेक्षित आहे. पंधरा वर्षांत एकही गृहप्रकल्प नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड